Friday, April 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City खा उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस वेलफेअर फंडला मदतनिधी

खा उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस वेलफेअर फंडला मदतनिधी

425
Adv


सातारा : खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यावर अफाट प्रेम करणारा त्यांचा चाहतावर्ग राज्यासह देशभरात आहे. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदोत्सवच असतो. यानिमित्ताने मग विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. अशाच सामाजिक बांधिलकीतून पोलीस दलाला सलाम म्हणून उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय असलेल्या युवा उद्योजक शैलेश संकपाळ व ॲड. जयेश यमकर यांनी पोलीस वेलफेअर फंडला एक लाख रुपयांचा मदतनिधी देत आगळ्या वेगळ्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना पोलीस वेलफेअर फंडासाठी एक लाखाचा निधीचा धनादेश खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पुण्यात सुपूर्द करण्यात आला. यावेळी शैलेश संकपाळ, ॲड. जयेश यमकर, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम पुण्यातील व्हीहीआयपी सर्किट हाऊस येथे झाला.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा व्यक्त करुन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या निधीबद्दल धन्यवाद व्यक्त केले. तर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, पोलीस प्रशासनाने कोरोना कालावधीत केलेल्या कामगिरीचा सर्वांना अभिमान असून पोलीस दलाची कामगिरी ही या काळात सर्वोत्तम अशीच झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत होता. यावेळी उदयनराजे भोसले यांनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयर्न मॅन,अल्ट्रामॅन आणि रॉ या स्पर्धा पूर्ण केल्या बद्दल विशेष अभिनंदन केले व पिंपरी चिंचवड मधली आयुक्तांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

Adv