
युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जन्मदिनाचे औचित्य साधुन,राजधानी साताराच्या शिर्षकाखाली उदयनराजे मित्र मंडळाच्या वतीने, सर्वाध्या मनावर गारुड करणारा झी मराठी, चला हवा येवू दया हा निख्खळ मनोरंजनाचा कार्यक्रम दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी सातारा जिल्हापरिषदेच्या विस्तिर्ण मैदानावर आयोजित करण्यात आला
आहे. या कार्यक्रमाकरीता उभारण्यात येणा-या, व्यासपिठ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामाचा शुभारंभ आज उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने श्रीफळ वाढवून करण्यात आला त्याप्रसंगी समुहाच्या वतीने औपचारिक माहीती देताना सांगीतले गेले की,80 बाय 60 चे भव्य व्यासपिठ याठिकाणी उभारणेत आले आहे. तसेच अत्याधुनिक पध्दतीचे आकर्षक
स्टेजबॅक ग्राऊंड. उच्य तंत्रज्ञानाने युक्त, सर्वोत्तम ध्वनीयंत्रणा आणि उच्य क्षेमतेची जनरेटरवरील विविध प्रकारची लाईट व्यवस्था पुरवण्यात येणार आहे. कलाकारांसाठी एकूण 20 मेकअप रूम्स तसेच प्रेक्षक आणि कलाकारांसाठी आपत्कालीन
कारणाकरीता, तात्पूरती टॉयलेट व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हापरिषदेच्या विस्तिर्ण मैदानावर प्रेक्षकांसाठी सुर्व्याची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. स्टेजवरील कार्यक्रम अधिक चांगला दिसावा म्हणून ठिकठिकाणी एलईडी स्कीनस् उभारणेत येणार आहेत. कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण 5 व्हॅनिटी व्हॅन्स
उपलब्ध असणार आहेत.
खुल्या मैदानात होणारा हा कार्यक्रम, सर्व खुला आहे. कुठलेही पास किंवा व्हीआयपी प्रवेशिकादिल्या जाणार नाहीत. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना, सर्वच नागरीकांन हे व्हीआयपी असल्याने, कोणत्याही प्रकारचे पासेस किंवा प्रवेशिका ठेवण्यात येवू नयेत अश्या सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्या असल्याने, जो प्रथम येईल त्यास ज्याठिकाणी योग्य वाटेल तेथे बसता येवून, कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.पत्रकार, छायाचित्रकार आणि विविध वृत्तवाहीन्यांच्या प्रतिनिधींना कार्यक्रमाचे वृत्तांकज, रेकॉडींग आणि प्रक्षेपणकरता यावे म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने, सातारा पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे. मैदानावर सुरक्षा रक्षक आणि
आपत्कालीन परिस्थितीकरीता, अग्नीशमन दल आणिसणवाहिका तैनातीची व्यवस्था केली आहे.कारोनाच्या पार्श्वभुमीवर, सध्या लाग असलेल्या सर्व नियमांचे पालन करुन, या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. प्रेक्षक नागरीकांनी देखिल सहकार्य करावे आणि ते करतील अशी खात्री आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आगामी झुंज या हिंदी चित्रपटाची टिम, अजय-अतुल,नागराज मंजुळे, आणि चित्रपटातील सर्व कलाकार या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहणार आहेतया स्टेज आणि विविध सुविधा उभारणे प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे,जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनीलकाटकर,काका धुमाळ, पंकज चव्हाण,मा उपनगराध्यक्ष किशोरशिंदे,बाळासाहेब गोसावी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,सुनील सावंत, सिने अभिनेते व जिल्हा परिषद माजी सदस्य समृध्दी जाधव,फिरोज शेख, रोहित सावंत,अॅड विनित पाटील, प्रशांत निंबाळकर, सुनील बर्गे,राहूल पाटोळे,शेतकरी संघटनेचे राजु पाटील, संदिप शिंदे,यांचे सह बहुसंख्य कार्यकर्ते मित्र समुहाचेहितचिंतक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.





