Friday, April 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साताऱ्यात ऐतिहासिक देखावा स्पर्धेचे आयोजन खा श्री छ उदयनराजे भोसले मित्र...

साताऱ्यात ऐतिहासिक देखावा स्पर्धेचे आयोजन खा श्री छ उदयनराजे भोसले मित्र समूहाचा आगळा वेगळा उपक्रम

433
Adv


खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने सातारा शहरातील सार्वजनिक मंडळांसाठी ऐतिहासीक देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये आयोजकांनी शिवजयंती साजरी करताना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित काही प्रसंगांचे देखावे सादर करावयाचे आहेत . करो नाचा संक्रमण दर उतरणीला लागल्याने सातारा शहरांमध्ये शिवजयंतीचा अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे त्यामुळे यंदाची शिवजयंती मोठ्या जल्लोषात आणि थाटात साजरी केली जाणार आहे या निमित्त खा श्री छ उदयनराजे भोसले मित्र समूहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून ऐतिहासिक देखावा स्पर्धा ही एक वेगळी स्पर्धा मानली जात आहे या पहिले बक्षीस 25 हजार रुपये द्वितीय बक्षीस 15 हजार रुपये तृतीय बक्षीस दहा हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पाच हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत

या देखावा स्पर्धेसाठी परीक्षक समिती स्वतंत्रपणे देखाव्यांचे परीक्षण करणार असून त्या आधारे गुणांकन केले जाणार आहे देखाव्याची कलात्मकता सादरीकरण या निकषांना धरून हे परीक्षण होणार आहे इच्छुक मंडळांनी माजी नगरसेवक कल्याण राक्षे 9422402070 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन खा श्री छ उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने करण्यात आले आहे

Adv