खुर्ची मिळाली की राम नामक उचा ‘पतीं’ ना सुरवात परळी दिशेने ओली पार्टी

168
Adv

आगामी आठ महिने पालिका निवडणुकीच्या निमित्ताने अत्यंत जवाबदारीचे आहे . ही जवाबदारी खुंटीला टांगून परळी रस्त्याला पाणी टाकून एका विभागाने भर दुपारी ओली पार्टी केली . त्यामुळे खुर्ची मिळताच जबाबदार सभापतींच्या नावाखाली राम नामक उचा ‘पती ‘ सुरू झाल्याने एकदा या विभागाचा कारभार चा सावळा गोंधळ समोर आला आहे .

आणखी एका सवचछ विभागाच्या एका वजनदार कर्मचाऱ्याचा सहभाग ही चर्चेचा विषय ठरला . सातारा पालिकेत पाचही विषय समित्यांवर खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांनी महिलांना संधी दिली आहे . नगराध्यक्ष माधवी कदम आणि सर्व महिला सभापतींना पुढील दहा महिने विकासकामांची आश्वासक पूर्तता करून राजकीय दृष्टया सातारा विकास आघाडीची घौडदौड निर्वेध करायची आहे . मात्र या जवाबदाऱ्यांना टांग मारून ओली पार्टी करायची सुबुध्दी काही जणांना सुचली आणि दुपारीच एका विभाग आणि काही उचा ‘पती मुळे’ ओली पार्टी करायला परळी मार्गाला रवाना झाले . नगराध्यक्ष माधवी कदम थेट मुलाखतीत व्यस्त, मुख्याधिकारी अभिजीत बापट ग्रामपंचायत निवडणुकीत गुंतलेले आणि उपनगराध्यक्षही बाहेर असल्याने दैनंदिन कामाला बाजूला ठेऊन जबाबदार विभागांचे भागाचे लिपिक सगळ्यांन न सांगता गायब झाल्याने दिवसभर या दालनात शुकशुकाट होता .

उचा ‘पती ‘ करणाऱ्यांच्या राजकीय बाता लांबलचक करण्याची हटके स्टाईल असून एका सभापतींच्या खुर्चीत आपणच असल्याचा अंगातला सोस निघेनासा झाला आहे . साताऱ्यात टाक्यांना लेव्हल न मिळणे, चढाच्या भागांना कमी दाबाने पाणी न येणे अशा समस्या गेल्या चार वर्षानंतरही सुटल्या नाहीत . नागरिकांचा पाण्यासाठी घसे सुकलेले असताना जबाबदार विभाग मात्र घसे ओले करायला बिनदिक्कतपणे रवाना झाला . एक कर्मचाऱ्यांने मात्र उगाच बोंब नको म्हणून मागून जाणे पसंत केले . विभागाचे पॉवर बाज म्होरके सुद्धा म्हणे या पार्टीत होते?
.
म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो ही म्हणं इथे नक्कीच लागू पडते . एका सभापतीपदाच्या खुर्चीची जवाबदारी मोठी असताना ऑन ड्यूटी पार्टीचा घालण्यात आलेला घाट म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळायचे असला प्रकार आहे .

सातारकरांसाठी पुढचे दहा महिने पाण्याची अखंड सेवा दिल्यावरच मतांचा मेवा मिळणार आहे , इथे मात्र काम सोडून घसा गरम करण्याची स्पर्धा लागल्याने संबंधित विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे .केबिनमध्ये बसूनच शिपायांना ऑर्डर सोडायची हे कोणत्याच तत्वात बसत नाही , सभापती नामधारी ठेऊन होणारे पती उद्योग डोकेदुखी ठरू शकतात याची राजकीय चाणक्यांनी नोंद घ्यावी इतकेच नमूद करावेसे वाटते .

Adv