Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City छ उदयनराजे यांच्या ग्रेडसेपरेटर उद्घाटनाने वाहतुकीचा प्रश्न मिटला नागरिकांनी राजेंचे मानले आभार

छ उदयनराजे यांच्या ग्रेडसेपरेटर उद्घाटनाने वाहतुकीचा प्रश्न मिटला नागरिकांनी राजेंचे मानले आभार

245
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ग्रेड सेपरेटर च्या उद्घाटनामुळे साताऱ्यातील वाहतुकीचा प्रश्न मिटल्याने सातारकर नागरिकांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे याबद्दल धन्यवाद मानले आहेत

सातारा शहरामध्ये असणाऱ्या पोवई नाक्यावर तब्बल आठ रस्ते एकत्र येतात दिवसेदिवस शहरातील वाढणारी वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, वाढणारी अतिक्रमणे पाहता शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहन चालकांनमध्ये नाराजीचे सुर निर्माण झाले होते

या सर्व गोष्टींचा विचार करुन खा श्री छ उदयनराजे यांनी सातारा शहरासाठी ग्रेड सेपरेटर मंजुर करुन घेतला होता. 76 कोटी रुपये खर्च करुन या बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे काम मार्गी
लागल्यानंतर वाहनांसाठी भुयारी मार्ग खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा विकास आघाडीने खुले केल्याने शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न मिटल्याने सातारा शहरासह विविध भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत

Adv