Monday, April 20, 2026
spot_img
Home Maharashtra संजय राऊत साहेब तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती?. गोपीचंद पडळकर यांचा...

संजय राऊत साहेब तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती?. गोपीचंद पडळकर यांचा सवाल

183
Adv

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भाजप व मविआ यांच्यात चांगलाच वाद निर्माण आहे. शिवसेना पक्षाने सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. या या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. यावरूनच पडळकर यांनी राऊतांना तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत असा खोचक प्रश्न विचारत टीका केली आहे.

पडळकर यांनी ट्विट केले आहे की,’सामना मी कधी वाचत नाही सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत त्याचसाठी हा पत्र प्रपंच’ असं म्हणत त्यांनी पत्रकातून पडळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे .

या पत्रकात नमूद लिहिले आहे की,“खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”.

Adv