शिवतिर्थासाठी मिळणार आणखी निधी श्री छ उदयनराजे यांनी मानले पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आभार

102
Adv

इतिहासात साता-याचे अनन्यसाधारण महत्व आहे याचे भान ठेवून, पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे दर्जेदार सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी लागणारा दुस-या टप्यातील अडीच कोटींचा निधी तसेच महाराणी ताराराणी यांचे समाधी स्मारकासाठी आणि शाहुनगरीतील ऐतिहासिक वास्तुंच्या सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजन मधुन निधी दिला जावा अशी आम्ही केलेली मागणी पालकमंत्री,सातारा तथा सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्य करतानाच पोवईनाक्यावरील स्मारकासाठी अडीच कोटी लगेच उपलब्ध करुन दिले जातील व अन्य बाबींसाठी
भरीव तरतुद केली जाईल असे ठोस आश्वासन दिले असल्याने आम्ही पालकमंत्री यांचे आभारी आहोत अशी माहीती राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा आणि नगरी हे ऐतिहासिक स्थान म्हणून ओळखण्यात येते इतिहासाच्या अनेक पाउलखुणा अनेकांना प्रेरणा देत असतात याच ठिकाणावरुन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विस्तारलेल्या स्वराज्याची सुत्रे हलवली जात होती काही ऐतिहासिक वास्तु काळाबरोबर नामशेष झाल्या तर काही वास्तु आजही अस्तित्वात आहेत या वास्तुंचे जतन करणे आपले परम कर्तव्य आहे. त्याचबरोबर अखंड हिंदूस्थानमध्ये रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणा-या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेसे पुतळा स्थान पोवईनाका येथे आहे तेथेच करण्याचा प्रयत्न म्हणून सुशोभिकरण आणि चबुतरा उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. याकरीता दुस-या टप्यातील कामास सुमारे अडीच कोटी रुपये आवश्यक आहेत. ही तरतुद जिल्हा नियोजन
मधुन तातडीने करणेबाबत आज आम्ही सातारचे पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना.बाळासाहेब पाटील यांना आणि जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना केली.

आमच्या सूचनेची आणि मागणी तातडीने दखल घेत ना.बाळासाहेब पाटील यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत दिलेले आश्वासन तसेच महाराणी ताराराणी यांच्या समाधी परिसराकरीता आणि सातारा शहर आणि जिल्हयातील ऐतिहासिक वास्तुंच्या देखभाल दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी भरीव तरतुद केली जाईल असे आश्वासन दिले आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.यावेळी जितेंद्र खानविलकर, जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर,गणेश भोसले, संग्राम बर्गे, इत्यादी उपस्थित होते

Adv