Friday, April 24, 2026
spot_img
Home Satara District Mahabaleshwar प्रतापगड भागात वनविभागास सापडला बारा फूट लांबीचा अजगर

प्रतापगड भागात वनविभागास सापडला बारा फूट लांबीचा अजगर

748
Adv

महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड भागामध्ये गुरुवारी वनविभागास तब्बल बारा फूट लांबीचा अजगर जखमी अवस्थेत आढळून आला वनविभागाने प्राणिमात्रांच्या सहकार्याने या अजगारास पकडून डॉ. जयसिंग सिसोदिया यांनी उपचार केले व सायंकाळी जंगमामध्ये पुन्हा सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या माहितीवरून वनक्षेत्रपाल महेश झंजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने या परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच जंगलामध्ये जखमी अवस्थेतील हा अजगर आढळून आला या अजगराच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या वनरक्षक रोहित लोहार, आशिष पाटील, लहू राऊत, दीपक सोरट, महादेव कट्टे, वनमजूर वागदरे तसेच सहयाद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे, शुभम टेके आदींनी या अजगारास पकडले व सुरक्षितरित्या हिरडा विश्रामगृह येथे उपचारांसाठी आणण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ जयसिंग सिसोदिया,डॉ संदीप आरडे यांनी त्याच्यावर उपचार केले महाबळेश्वर तालुक्यात प्रथमच अशाप्रकारे अजगर आढळून आला आहे त्याची लांबी तब्बल बारा फूट आहे मादी जातीचे या अजगराचे वजन चाळीस किलोहुन अधिक असून अंदाजे सात ते आठ वर्षे वय आहे त्याच्यावर उपचार करून सायंकाळी पुन्हा जंगलामध्ये सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभाचे अधिकाऱ्यांनी दिली.

Adv