Sunday, April 26, 2026
spot_img
Home Satara District Satara City सातारानामा व नगरसेवक मोरे पाटील यांच्या दणक्याने गुडगुडी बाबाला आली जाग

सातारानामा व नगरसेवक मोरे पाटील यांच्या दणक्याने गुडगुडी बाबाला आली जाग

117
Adv

नगर विकास आघाडीचे नगरसेवक शेखर मोरे पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून या गुडगुडी बाबाने प्रभागात येतो असे सांगून फसवत असल्याचे वृत्त प्रसारित होताच गुडगुडी बाबानी नगरसेवक शेखर मोरे पाटील यांच्यासमोर लोटांगण घातले

नगरसेवक शेखर मोरे पाटील हे गोडोली चे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत पावसाळा तोंडावर आला आहे यांच्या पार्श्वभूमीवर ओढे-नाले पाहून साफ करण्यासाठी गुडगुडी बाबाला गेल्या तीन दिवसांपासून नगरसेवक मोरे पाटील पाठपुरावा करत होते मात्र त्यांना कसलीही दाद या गुडगुडी बाबाने दिली नाही एवढी मस्ती या गुडगुडी बाबाची कशी वाढली याचा अनुभव खुद्द नगरसेवक शेखर मोरे पाटील यांना सुद्धा आला होता संबंधित नगरसेवक यांनी संबंधित विभाग प्रमुखास काळे फासण्याचा इशाराही या वेळी दिला होता सातारानामा च्या दणक्यानंतर गोडोली तील ओढे-नाले साफ होऊ लागले आहेत

गोडोली येथे सलग दोन वर्ष पूर परिस्थिती निर्माण झाली होती याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगरसेवक शेखर मोरे पाटील ओढे-नाले साफ करण्यासाठी पाठपुरवठा करत होते या लढ्यास सातारनामामुळे आज यश आले असल्याची ग्वाही नगरसेवक मोरे पाटील यांनी दिली असून त्यांनी सातारानामा चे विशेष आभारही मानले आहेत

Adv