Thursday, July 23, 2026
spot_img
Home Satara District जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला सरपंच आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष

जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला सरपंच आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष

233
Adv
जाहिरात

सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला असून या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे . राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केल्याने गावागावात आता राजकीय राळ बरीच उडणार आहे .

सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींची प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अंतिम करण्यात आली . दि १४ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून या निवडणुका पारदर्शी वातावरणात व मुदतीत पार पाडण्याची जवाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे . मार्च महिन्यात उद्भव लेल्या करोना संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरम्यान मतदान केले जाणार आहे . महाराष्ट्रात नांदेड जिल्हया खालोखाल सर्वाधिक ग्रामपंचायती सातारा जिल्ह्यातील असून जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे . त्या त्या कार्यक्षेत्रातील तहसीलदारांकडून आचार संहितेची घोषणा करण्यात आली सातारा तालुक्यात 133, पाटण तालुक्यात 107 खटाव तालुक्यात 90, कराड तालुक्यात 103,. फलटण तालुक्यात 78 जावली तालुक्यात 75 खंडाळा तालुक्यात 57, वाई तालुक्यात 76 कोरेगाव तालुक्यात 55, महाबळेश्वर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे .

चौकट-

१ नामनिर्देशन पत्र दाखल करणे –

23 ते 30 डिसेंबर. सकाळी ११ ते दुपारी ३

२ . छाननी प्रक्रिया – ३१ डिसेंबर ( सकाळी ११ वाजल्यापासून )

३ अर्ज माघारी – ४ जानेवारी ( दुपारी 3 वाजेपर्यंत )

४ . उमेदवारांना चिन्ह वाटप – ४ जानेवारी

५ . मतदान – १५ जानेवारी

६ . मतमोजणी – १८ जानेवारी

सकाळी आठ वाजल्यापासून

चौकट- भाजप विरूद्ध राष्ट्रवादी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला धूळ चारली . सातारा जिल्हयात बहुतांश ठिकाणी व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे . त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने भाजप व राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने येणार आहेत . महाविकास आघाडीचे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी हे त्रिकुट स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्र येणार का ? हा खरा कळीचा मुद्दा आहे .

Adv