Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District छत्तीस कर्मचाऱ्यांची पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी सहाव्या वेतन आयोगासाठी संबळ वाजवून वेधले प्रशासनाचे...

छत्तीस कर्मचाऱ्यांची पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी सहाव्या वेतन आयोगासाठी संबळ वाजवून वेधले प्रशासनाचे लक्ष

407
Adv

सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांनी टाळ व संबळ वाजून शुक्रवारी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण केले . मात्र प्रशासन व कर्मचारी यांच्यातील चर्चा मात्र निष्फळ ठरली, वेतन आयोगाची अंमल बजावणी करण्यास मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला

इशारा दिल्याप्रमाणे सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे लाभ न मिळालेल्या 36 कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी टाळ आणि संबळाच्या गजरात आपले लाक्षणिक उपोषण सकाळी साडेदहा वाजल्या पासून सुरू केले . पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ बारनिशीच्या दर्शनी भागात छत्तीस कर्मचाऱ्यांनी बसकणं मारून लाक्षणिक आंदोलन केले . वेतन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली .पालिकेत आस्थापनेवर कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला . सुहास पवार यांनी ही आंदोलनात सहभाग घेतला .

छत्तीस जणांच्या या आंदोलनामुळे शुक्रवारी पालिकेचे दैनंदिन कामकाज कोलमडले . सीएफसी, आस्थापना, शहर विकास, अतिक्रमण, जनगणना विभाग इ विभाग पूर्णतः बंद होते . काही विभागांचा अपवाद वगळता पालिकेमध्ये पूर्णतः शुकशुकाट होता . या लाक्षणिक उपोषणामुळे दिवसभर कोणतेही काम होऊ शकले नाही . कर्मचाऱ्यांशी चर्चा करायचे सोडून मुख्याधिकारी , नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे सकाळच्या सत्रात पालिकेकडे लवकर फिरकलेच नाहीत. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आपल्या दालनात कर्मचाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केली . सतरा वर्षाची सेवा व नगर विकास राज्यमंत्र्यांनी 2 मार्च 2016 रोजी दिलेला पदोन्नती व वेतन आयोग अंमलबजावणीचा दिलेला आदेश ही बाजू आंदोलकांनी चर्चेत लावून धरली . उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यावेळी उपस्थित होते . चर्चेची ही फेरी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सुध्दा दालनात पार पडली . मात्र त्यांनी नगरपरिषद संचालनालयाकडे बोट दाखवून हा विषयच झटकल्याने चर्चा निष्फळ झाली .

सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा अधिकार मला नाही .. तुमचा प्रश्न डीएमए कार्यालयात प्रलंबित आहे मी काही करू शकत नाही असे शंकर गोरे यांनी सांगत सहकार्य करण्यास नकार दिला . त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

Adv