मंत्री गोरे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

189
Adv

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला कॅबिनेट मंत्रीपदी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी आभार मानले यावेळी आमदार राहुल कुल उपस्थित होते

काल महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला दिग्गज नेत्यांच्या या मंत्रिमंडळात समावेश होता पण एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली ते म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिल्याने येईल त्या खात्याची जबाबदारी व्यवस्थित रित्या पार पाडणार असल्याची ग्वाही मंत्री गोरे यांनी दिली

मान खटाव सारख्या एका छोट्या गावात जन्म घेतलेल्या जयकुमार गोरे यांची आमदारकीची ही चौथी टर्म सुरुवातीला अपक्ष त्यानंतर काँग्रेस व भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आमदार गोरे यांचे पहिल्यापासूनच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांच्याशी चांगले संबंध राहिलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली

Adv