महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ प्रमुख तायाप्पा शेंडगे आणि संदीप मनोरे सर तसेच सातारा जिल्हा निवड प्रमुख विक्रम लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, सातारा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सातारा जिल्हा अध्यक्षपदी प्रा. गौरव जाधव यांची निवड करण्यात आली.
शारीरिक शिक्षण शिक्षकांना विनाअनुदानित व अनुदानित तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदांची संख्या वाढवावी व ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक यांचा विकास साधण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी अशा विविध मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी सातारा जिल्हा महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष – गौरव जाधव
कार्याध्यक्ष -उल्हास जाधव
उपाध्यक्ष – प्रकाश भोसले , प्रणाली सहस्त्रबुद्धे , विक्रम उंबरकर , निलेश मुळक ,सौरभ चव्हाण ,अजीम इनामदार ,
सचिव – अमोल पालेकर
सहसचिव – अमोल साळवी
खजिनदार – मयूर संकपाळ
प्रसिद्धीप्रमुख – इंद्रजीत मोरे
संपर्कप्रमुख – राहुल सावंत ,गजानन जाधव संघटक – अमीर जाधव ,गणेश कांबळे ,सचिन चव्हाण ,स्वप्निल इंगवले ,गौरव माने ,अरुण पिसाळ ,नितेश भोसले ,मुंसिफ वारूनकर यांसह 26 सदस्यांची अशी एकूण 55 जणांची कार्यकारणी नेमणूक करण्यात आली आहे.