Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District अनिता घोरपडे यांच्याकडून शहराच्या आरोग्याचे नियोजन आरोग्य लक्ष्मी मिळाल्याचे सातारकरांना समाधान

अनिता घोरपडे यांच्याकडून शहराच्या आरोग्याचे नियोजन आरोग्य लक्ष्मी मिळाल्याचे सातारकरांना समाधान

332
Adv

सातारा शहराच्या आरोग्याचे नियोजन करण्यासाठी व सोशल डिन्स्टसिंग चा प्रसार करण्यासाठी आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी पुढाकार घेतला आहे . शहराच्या निर्जंतुकीकरणासह स्वच्छता मोहिम व होम टू होम सर्वेच्या नियोजनावर आरोग्य सभापतींनी बारकाईने लक्ष ठेवले आहे .

आरोग्य विभागाच्या नियोजनाची सूक्ष्म आखणी करत आरोग्य सभापतीनी कामाची आखणी व अहवाल यावर भर दिला आहे . प्रभाग क्रं १ ते २० मध्ये जंतुनाशक फवारणी व स्मोक फॉगिंग सुरू आहे . दि 22 मार्च पासून गेल्या दोन आठवड्यात 52 हजार लीटर जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली .

उपमुख्याधिकारी संचित धुमाळ व आरोग्य निरीक्षक यांच्याशी अनिता घोरपडे यांनी सातत्याने समन्वय ठेवत शहराचा कोणता कोपरा फवारणी पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली . तसेच त्रिशंकू भागातही धूर व जंतुनाशक फवारणी करण्याचा आग्रह त्यांनी धरला .

नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्यासह शहराचा प्रत्येक प्रभाग पिंजून काढत प्रत्येक वॉर्डात सभापतींनी सोशल डिस्टन्सिंग चा संदेश दिला . प्रत्येक घंटागाडीवर करोना प्रतिबंधाचा प्रबोधनात्मक संदेश प्रसारीत केला आहे . आरोग्य सभापतींनी जनजागृती करिता सातारा स्वच्छ राखण्याच्या जिंगल्स बनवून घेतल्या .

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक अशोक घोरपडे यांचा कामाचा झपाटा लक्षात घेऊन फार पूर्वीच कामासाठी वाव असणाऱ्या शहराच्या आरोग्य विभागाची जवाबदारी अनिता घोरपडे यांच्याकडे देण्यात आली .

नागरिकांच्या समस्या समजाऊन घेत शहराच्या कानाकोपऱ्यात कम्युनिटी ङस्ट बिन चे सभापतींनी नियोजन केले . याशिवाय पुढील पावसाळ्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील ओढे व नाले यांच्या सफाईचे नियोजन व बैठकांचे सत्र सुरू झाले आहे . स्थायी समितीच्या तांत्रिक मंजुरीची केवळ आवश्यकता उरली आहे . करोनाच्या जीवघेण्या संक्रमणाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत . त्यासाठी आरोग्य सभापती कमरेला पदर खोचून मैदानात उतरल्या आहेत .

Adv