Thursday, April 23, 2026
spot_img
Home Satara District जिल्ह्यातील 162 प्रभागांची प्रारूप रचना जाहीर

जिल्ह्यातील 162 प्रभागांची प्रारूप रचना जाहीर

282
Adv

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत असे विधेयक राज्य सरकारने पास केले आहे तरी पण अद्यापही तसा अध्यादेश जाहीर झालेला नाही निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे गुरुवारी सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व एक नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 162 जागांची प्रारुप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद संकलन विभागातून ही माहिती देण्यात आली

या प्रारूप प्रभाग रचना यांची राजकीय वर्तुळामध्ये खूप उत्सुकता होती आपल्या प्रभागमध्ये कोणता बदल झाला अथवा नाही हे पाहण्याकरता बऱ्याच नगरसेवकांनी आज नगरपालिकेत धाव घेऊन आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात प्रभागरचना चे नकाशे बंदिस्त केले . जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग नगरपालिकेच्या 50 सदस्यांसाठी 25 प्रभागांची रचना निश्चित करण्यात आली आहे . सातारा शहरांमध्ये प्रभाग क्रमांक सात हा सर्वाधिक लोकसंख्येचा म्हणजे 7908 आठ लोकसंख्येचा आहे तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये 6630 ही सर्वात कमी लोकसंख्या आहे यावेळी सातारा शहराच्या हद्दवाढीला नंतर एकूण 1 लाख 80 हजार 568 लोकसंख्या मतदान करणार आहे यामध्ये अनुसूचित जातीच्या एकवीस हजार आठशे तर अनुसूचित जमातीच्या 2057 लोकसंख्येचा समावेश आहे. कराड पालिकेमध्ये 31 वॉर्ड 15 वर निश्चित असून दोन सदस्यांची चौदा तर एक वाढतील सदस्यांचा अंतिम करण्यात आला आहे याकरिता 74 हजार 355 लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे रहिमतपूर पाचगणी महाबळेश्वर व मसवड या चार नगरपालिका साठी दहा प्रभागांसाठी वीस नगरसेवकांची निवड मतदारांना करावयाचे आहे कराडमध्ये पंधरा प्रभागांसाठी 31 तर फलटणमध्ये तेरा प्रभागांसाठी 27 वाई मध्ये तेरा प्रभागा मधून 27 आणि मेढा नगरपंचायतीसाठी सतरा नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत या प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आज सकाळी जाहीर करण्यात येऊन त्या प्रभागरचना चे नकाशे त्या-त्या नगरपालिकांच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात आले .

या प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहेत कोणताही प्रभाग निश्चित करताना प्रभागाच्या भौगोलिक हद्दी लक्षात घेण्यात आल्या आहेत ज्या प्रभागात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरता क्रम सर्वात कमी होता तो प्रभाग क्रमांक एक म्हणून जाहीर करण्यात आला आहे त्या प्रभागाची नैऋत्य पूर्व दिशा पकडून झेड पद्धतीने या रचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले जिल्ह्यामध्ये प्रारूप प्रभाग रचना ची मोठी उत्सुकता दिसून आली मध्ये नगरसेवकांनी या प्रभागरचना पाहण्याकरता मोठी गर्दी केली होती जिल्ह्यात 162 प्रभागांमध्ये 168 मतदार निवडून द्यावयाचे आहेत सर्वात मोठे व सर्वात लहान वार्ड कोणते आहेत याची माहिती गोळा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते

Adv