सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळावा शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन सातारा येथील जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुधिर महामुनी यांच्या समवेत शाळा समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी शाला पमुख सुनिल शिवले.उपशालाप्रमुख सौ. सुनिता राव, पर्यवेक्षिका सौ. लता दळवी, सौ. सुजाता पाटील, श्रीमती विनया कुलकर्णी, क्रिडा महोत्सव प्रमुख सुधाकर गुरव, उपप्रमुख संदिप माळी, पालक प्रतिनिधी प्रशांत मोहिते, सौ. किर्दत, सौ. बोभाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेच्या विद्यार्थ्यानी पहाटे कुरणेश्वर मंदिरापासून काढलेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागतही पाहुण्यांनी केले. सरस्वती पूजनानंतर मान्यवरांना शाळेच्या एन.सी.सी.आर्मी,नेव्ही व स्काउट पथकाने मानवंदना दिली.प्रमुख पाहुण्याचा सत्कार शालाप्रमुख यांनी शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून केला. तसेच कला शिक्षक घन:श्याम नवले व संदीप माळी यांनी तात्काळ ़ कार्यक्रम स्थळी रेखाटलेल्या पाहुण्यांच्या पेन्सिल स्केचची भेट पाहुण्यांना देण्यात आली.यावेळी क्रिडा गीताची सुमधुर धुन सचीन राजोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथकाने सदार केली.
आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळा प्रमुख सुनिल शिवले यांनी क्रिडा महोत्सव हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकासातील एक घटक असून संस्थेव्दारे दिले जाणारे कृती युक्त शिक्षण मुल्यमापन करण्यासाठी याचे आयोजन केल्याचे सांगितले सांघीक प्रयत्नांच्या कौशल्यातून हा मेळावा संस्थेच्या ब्रीद वाक्य असणार्या एकी हेच बळ यातून आपणा सर्वांचा शारीरीक व बौद्धिक विकास साधला जाईल असे सांगितले.
या वर्षीपासून अनेक शिक्षकांनी आपल्या कडून थोरांच्या स्मृती जपत त्यांची नावे विविध खेळांसाठी शाळेकडे सहा चषक बहाल केले याबद्दल या सर्व शिक्षक शिक्षीकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेच्या मुला-मुलींच्या विविध समुहांनी पाहुण्यांपुढे निशाण कवायत,ड्रील कवायत,निर्भया पथक, झेंडे, डंबेल्स, लेझीम, जळत्या कौलांना फोडणे, कराटे,ज्युदो या खेळांची प्रात्याक्षिके दाखवून अचंंबित केले.
अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी या क्रिडा महोत्सवाला शुभेच्छा देत पुढील दोन तीन दिवसात आपण सर्वजन जे पराक्रम घडवणार आहात ते आपणा सर्वांना आगामी वर्षासाठी उर्जा देणारे आहेत. यशस्वी होण्यासाठी संस्कार मुल्यांचा धडा आपण जोपासा शाळा प्रमुख सुनिल शिवले सरांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या क्रिडा महोत्सवात विविध खेळांची प्रात्यक्षिके पाहताना भारतीय परंपरा आपण जपत आहोत व तिला उंचावर नेण्याचे कार्य तूम्ही करत आहात. प्रत्येकाने स्वभावात खेळाडू वृत्ती जोपासा या शाळा माउलीने आजपर्यंत लाखो नररत्ने निर्माण केली तूम्हीही या आदर्शाची वाटचाल पूढे ठेवून मोेठे व्हा असे सांगीतले.