सातारचे माजी खासदार,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, किसन वीर साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्व. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांनी सामाजिक, राजकीय, सहकार,शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला असून कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणजे स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील, असे गौरवोद्गार किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी काढले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाई-खंडाळा -महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील कायम पक्षासोबत निष्ठेने राहिले. तात्यांनी आपल्या जीवनाची सुरूवात गावच्या सरपंच पदापासून केली. पुढील काळात त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, जनता शिक्षण संस्था, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष तसेच सातारचे खासदार म्हणूनही काम केले. तात्यांनी आपल्या संपुर्ण जीवनात कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून खऱ्या अर्थाने ताकत देण्याचे काम केलेले आहे. किसन वीर कारखान्याचे विस्तारीकरण केले, जिल्हा बँकेलाही त्यांच्या काळात विविध पुरस्कार मिळालेले होते, यातूनच त्यांनी राबविलेले विकासात्मक व धोरणात्मक कामे दिसून येतात. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना ताकद देण्याचे काम तात्यांच्या पाठीमागे किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील करीत आहेत. त्यामुळेच समाजकारण व राजकारणात पाटील कुटुंबाच्या पाठीशी सर्वसामान्य जनता राहिलेली दिसून येत असल्याचेही यावेळी शिंदे यांनी नमुद केले.
प्रारंभी स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, बाळासाहेब वीर, महादेव मस्कर, शशिकांत पवार, मनिष भंडारी, प्रकाश पावशे, अॅड. उमेश सणस, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, भुईजचे ग्रामपंचायत सदस्य नारायण नलवडे, सुजितसिंह जाधवराव, गिरीश कडाळे, अमृत गोळे, विकास बाबर, मामा पाटील, दादा गायकवाड, अमित कदम, शामराव गायकवाड, प्रविण पवार, गणेश शेडगे, पोपटराव जगताप विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद शेतकरी उपस्थित होते.