महाराष्ट्र केसरी राक्षे यांनी घेतली छ उदयनराजेंची भेट,

380
Adv

यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान शिवराज राक्षेने पटकावला महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी आज खासदार छ उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी खा छ उदयनराजे भोसले यांनी शिवराजचा पगडी आणि गदा देऊन सत्कार केला

मोठ्या स्पर्धांच्या ठिकाणी राजकारण पाहिला मिळतं हे थांबायला पाहिजे,चांगला खेळाडू असेल तर त्याला शिफारशीची गरज नाही, योग्य खेळाडूला संधी मिळायला हवी असं मत छ उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे चांगल्या खेळाडूंना राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असं मतही छ उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केलं.

‘खेळात राजकारण नको’
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं नियोजन अतिशय उत्कृष्ट होतं, कुस्ती या खेळाला ऐतिहासीक पार्श्वभूमी आहे. कठोर मेहनतीच्या जोरावर शिवराजने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला, त्याला मनापासून शुभेच्छा अशी प्रतिक्रिया छ उदयनराजे भोसले यांनी यावेळी महाराष्ट्र केसरी राक्षे याला दिल्या

Adv