स्लिंगशॉट असोसिएशन ऑफ इंडियन तर्फे शिर्डी येथे 9 एप्रिल 2023 रोजी झालेल्या, 8 व्या नॅशनल स्लिंगशॉट चॅम्पियनशिप 2023 मध्ये महाराष्ट्रातर्फे खुल्या गटात खेळताना ,भारतीय जनता पार्टी, सातारा शहराध्यक्ष सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि श्री विकासजी गोसावी यांनी सांघिक प्रकारात गोल्ड मेडल आणि वैयक्तिक प्रकारात सिल्व्हर मेडल मिळवले
विकास गोसावी हे स्लिंगशॉट असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष आहेत, त्यांनी 2016, 2017, 2018 या तीन वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून 2019 साली रौप्य पदक मिळवले आहे, परत 2023 साली सुवर्णपदक आणि रौप्य पदकाची कमाई केली
विकास गोसावी यांनी स्लिंगशॉट या खेळाची माहिती दिली, ते म्हणाले की स्लिंगशॉट हा खरेतर आपलाच ग्रामीण खेळ गलोरी असून तो खूप पूर्वीपासून आपल्याकडे खेळला जातो, परंतु राजकीय उदासीनते मुळे आपल्याच खेळांना मान्यता मिळत नाही , या बाबतचा पत्रव्यवहार मा पंतप्रधान, क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलम्पिक महासंघ यांच्याकडे केला असून ग्रामीण खेळ मुख्य प्रवाहात यावेत, त्यांना राजाश्रय आणि शासकीय मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत
राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सातारा जावळी विधानसभा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष आ श्री जयकुमार गोरे यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवल्या बद्दल विकास गोसावी यांचे अभिनंदन केले, राजकारणात सक्रिय असूनही आणि पक्षवढीसाठी धावपळ करतानाची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा क्षेत्रात कार्यरत असल्यानेच त्यांची खिलाडूवृत्ती शाबूत असल्याची टिप्पणी केली, त्यांनी स्लिंगशॉट या खेळाची माहिती घेतली, तसेच ग्रामीण खेळाच्या संवर्धनासाठी चालू असलेल्या प्रयत्नांबद्दल विकास गोसावी यांचे कौतुक केले, स्लिंगशॉट असोसिएशन ऑफ इंडियन चे राष्ट्रीय सचिव श्री लवकुमार जाधव, महाराष्ट्र सचिव श्री मदन बदर यांचेही कौतुक करून स्लिंगशॉट या खेळाला राजाश्रय आणि शासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार आणि प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले
खा श्री छ उदयनराजे यांनी स्वतः स्लिंगशॉट (गलोरी) ने नेम धरून दिलेले आश्वासन लवकरच पूर्ण करण्याचे संकेत दिले
या वेळी भा ज पा सातारा जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे,सातारा ग्रामीण प्रभारी गणेश पालखे, चिटणीस सुनील जाधव, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख वैभव यादव, सातारा विधानसभा विस्तारक आणि ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष अविनाश खर्शीकर,शहर उपाध्यक्ष चंदन घोडके उपस्थित होते