Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District कराड तालुक्यातील मुंढे गावच्या 29 वर्षीय संदीप सावंत यांना वीरमरण*

कराड तालुक्यातील मुंढे गावच्या 29 वर्षीय संदीप सावंत यांना वीरमरण*

199
Adv

साताऱ्याचे जवान संदीप सावंत यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं आहे. नौशेरा या ठिकाणी ही घटना घडली. संदीप सावंत हे सातारा जिल्ह्यातील मुंडे गावाचे रहिवासी होते. २५ वर्षीय संदीप सावंत यांच्यामागे त्यांची पत्नी सविता या आहेत. नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी सज्ज झाले. दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे नेमकी संख्या समजू शकली नाही.

मात्र संदीप नाईक यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आलं.
नाईक संदीप सावंत आणि रायफलमॅन अर्जुन थापा या दोघांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. या दोघांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहिल अशा शब्दात ले. कर्नल देवेंदर आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Adv