उपनगराध्यक्ष शेंडे व आरोग्य सभापती कामात सक्रिय बाकीचे सभापती विकास कामांमध्ये फेल

68
Adv

हद्दवाढीनंतरच्या सातारा शहराच्या पायाभूत सुविधांचे आव्हान पेलण्याची गरज असताना सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे सभापती अपवाद वगळता पालिकेकडे फिरकेनासे झाले आहेत .नागरिकांच्या दैनंदिन कामाची ओरड होऊ लागल्याने जवाबदारी निश्चित केलेल्या पदाधिकाऱ्यांचा बेजवाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे .

पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, महिला बाल कल्याण सभापती सुनिता पवार , समाजकल्याण सभापती संगीता आवळे तब्बल चार सभापती कित्येक महिने केबिनचे तोंडच न पाहिल्याने राजकीय दृष्टया महत्वाच्या पुढील दहा महिन्यात या विभागांच्या विकास कामांचा काय उजेड पडणार या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यात विद्यमान उल्ले खित सभापती सपशेल नापास झाले आहेत . सर्वात संवेदनशील विभाग असणाऱ्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती यशोधन नारकर आजारपणामुळे गेले चार महिने पालिकेकडे फिरकलेच नाही . मात्र वर्क फ्रॉम होम हे सूत्र ही त्यांनी पाळले नाही . नियंत्रण आणि समन्वय नसल्याने सातारा शहरात घंटेवारीची बोंब झाली आहे .

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या दालनात नागरिकांचा सातत्याने त्रागा व्यक्त होत आहे . महिला बाल कल्याण समितीची फेबुवारी महिन्यात शेवटची बैठक झाली होती . त्यानंतर या समितीचा पंचवीस लाखाचा निधी इतर कामांसाठी व्यपगत झाला . अन लॉक प्रक्रियेत सुध्दा सभापती सुनीता पवार व इतर समिती सदस्य केबिनकडे गेल्या चार महिन्यात फिरकल्या नाही . नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे यांनी गेल्या दीड वर्षात शहराच्या विकासाचे कोणतेच नियोजन न केल्याने त्यांची कामगिरी शून्य आहे . समाजकल्याण सभापती संगीता आवळे त्यांचे दालन म्हणजे भंगार वस्तूंचे गोडावून झाले आहे . बांधकाम सभापती मिलिंद काकडे केबिन ला दिसतात मात्र त्यांचा खुर्चीत बसून घेतलेला कागदोपत्री आढावा अफलातून असतो .

शहरातील कोणत्याही बांधकामावर आणि त्यांच्या एकंदर कामकाजावर काकडे यांचा कोणताच वचक नसतो . तसे ते भाजपचे माजी गटनेते असले तरी कट्टर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे समर्थक . मात्र त्यांनाही उल्लेख करावा अशी कोणतीही कामगिरी करता आली नाही .एकूणच या चार सभापतींच्या कामकाजावर सातारकर प्रचंड नाराज आहे . पर्यायाने या नाराजीची राजकीय किंमत दहा महिन्यानंतरच्या पालिका निवडणुकीमध्ये मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यां सभापतींची शहराच्या विकासासाठी चांगलीच झाडाझडती घेण्याची गरज निर्माण झाली आहे .

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे ऑन फील्ड, आरोग्य सभापती अनिता घोरपडे सुद्धा सक्रीय

या सर्व सभापतींमध्ये आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांचे काम मात्र नजरेत भरण्यासारखे आहे . प्रतापसिंह नगर झोपडपट्टीत शंभर टक्के नागरिकांची करोना चाचणी करून घेण्यात त्यांनी धडाडी दाखविली शहरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व चुकारांना दंड हे धोरण त्यांनी राबविले . करोनाच्या महामारीतही अनिता घोरपडे यांचा दिवसभर केबिनमध्ये ठिय्या देऊन आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा असायचा . या जोडीला शिक्षण मंडळाचे सभापती व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पायाला भिंगरीच लावली आहे .
ग्रेड सेपरेटरचा पाठपुरावा, पंतप्रधान आवास योजनेचा आढावा, हद्दवाढीच्या नवीन भागाची स्वच्छता, पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजाचे सुसुत्रीकरण, शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती, शहरातील रस्त्यांच्या कामाचा आढावा , दोन दिवसात शहरातील चाळीसहून अधिक शाळा इमारतींचे निर्ज जंतुकीकरण अशा विविध कामांमध्ये उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व्यक्तिशः लक्ष घालत आहेत .

Adv