सकाळी कमळ दुपारी तुतारी या कार्यकर्त्यांना अद्दल घडणार का

615
Adv

जिल्ह्यातील काही प्रमुख नेते महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात उभे असून आपल्याला राज्यात महायुती बळकट करायची असल्याचे गेले पंधरा दिवस प्रचारात सांगत असून नेत्यांचे कार्यकर्ते मात्र तुतारी फुंकणाऱ्या माणसाचा प्रचार करत असून यां असल्या डबल ढोलकी कार्यकर्त्यांना महायुतीचे नेते जाब विचारणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे

जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काही कार्यकर्ते नेत्यांबरोबर एक भूमिका व दुसऱ्या तालुक्यात तिसरी भूमिका अशी डबल ढोलकी बजावत असल्याने हे निष्ठावंत आपल्या नेत्याशी एकनिष्ठ तरी असतील का अशी शंका मतदार घेत आहेत महाविकास आघाडी, महायुतीचे नेते राज्यात सत्ता कशी येईल अशी भूमिका घेत आहेत मात्र कार्यकर्ते नेत्यांच ऐकत नसल्याचे या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाले तसेच सोशल मीडियावर फोटोही वायरल होत आहेत त्यामुळे या नेत्यांचे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्याशी तरी एकनिष्ठ भविष्यात राहणार का अशी शंका आता जिल्ह्यातील मतदार घेत आहेत

नेत्यांचा आदेश न मानणाऱ्या कार्यकर्त्यांना नेते काय वागणूक देणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे डबल ढोलकी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांनी लांब ठेवले तरच नेत्यांवर सुद्धा मतदारांचा विश्वास राहील अन्यथा नेत्यांच्या मर्जीने एकमेकांचा प्रचार करण्यास संमती असल्याचा भ्रम सर्वसामान्य मतदारांचा होण्यास वेळ लागणार नाही

ज्या नेत्यांचे कार्यकर्ते डबल ढोलकी भूमिका घेत आहेत त्या नेत्यांच्या वरिष्ठ पातळीवर गेल्या आठ दिवसापासून याची चर्चा होत असून स्वतःच्या नेत्याची उंची करण्याचे कामच हे डबल ढोलकी कार्यकर्ते करत असल्याची चर्चाही काही नेत्यांचे जवळचे हितचिंतक खाजगीत चर्चा करताना दिसून येतात

Adv