माशेलकर समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने भारत सरकारने सन 2003 मध्य राष्ट्रीय वाहन धोरणाची घोषणा केली आहे. त्यानुसार दिनांक 01.04.2005 पासन दिल्ली, अहमदाबाद, बगळूरु, मुबई, पुणे आणि कोलकत्ता या शहरांमध्ये चारचाकी वाहनांची नोंदणी करताना वाहने BS-IV (BS-4) मानकाचा पूर्तता करणारी असल्याचे बंधनकारक करण्यात आले. तदनंतर विविध शहरांकरिता वेगवेगळया तारखा निश्चित करण्यात आल्या आणि अंतिमत: दिनांक 01.04.2017 पासून सर्व वाहनांकरिता BS-IV (BS-4) मानकाची पूर्तता अनिवार्य करण्यात आली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 24.10.2018 रोजीच्या आदेशानुसार दिनांक 01.04.2020 नंतर कोणतेही BS-V (BS-4) वाहनाची विक्री करता येणार नाही. तसेच भारतातील कोणत्याही परिवहन कार्यालयात त्याची नोंद करता येणार नाही. म्हणजेच जी वाहने BS-IV (BS-4) या मानकानुसार उत्पादित केली असतील तर त्या वाहनांची नोंदणी दिनांक 31.03.2020 पर्यंतच पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानुसार दिनांक 01.04.2020 पासून BS-VI (BS-6) या मानकानसार उत्पादित वाहनेच भारतभर नोंदणी होऊ शकतील याची नोंद सर्व उत्पादक, वाहन वितरक व ग्राहक यांनी घ्यावी. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे BS-IV (BS-4) वाहनाची नोंदणी प्रक्रिया दिनांक 31.03.2020 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक राहील. त्यानंतर प्रलंबित प्रकरणांची नोंदणी पूर्तता होऊ शकणार नाही याची सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.
उपरोक्त विषयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सातारा, फलटण, वाई, कराड इत्यादी तालुक्यातील सर्व वाहन वितरकांची गुरुवार दिनांक 27.02.2020 रोजी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निरसन करुन आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत. ज्या BS-IV (BS-4) वाहनांची तात्पुरती नोंदणी (CR.Temp.) झालेली असेल तसेच जी वाहने बॉडी बिल्डींगसाठी गॅरेजेसमध्ये असतील अशा वाहनांची नोंदणी प्रक्रिया दिनांक 31.03.2020 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य राहील. सर्व वाहन वितरकांना व वाहन धारकांना कळविण्यात येते की, आपण आपले BS-IV (BS-4) वाहन काही कारणास्तव नोंदणी करावयाचे प्रलंबित असेल तर अशा वाहनांची नोंदणी दिनांक 20.03.2020 पूर्वी पूर्ण करुन घ्यावी. जेणेकरुन सर्व उर्वरित कामकाज दिनांक 31.03.2020 पर्यंत पूर्ण करता येईल. दिनांक 31.03.2020 नंतर फक्त BS-VI (BS-6) मानकाच्या वाहनांचीच नोंदणी करता येणार आहे.
गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करुन इच्छिणा-या ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, दिनांक 25.03.2020 रोजी गुढीपाडवा असून त्या अगोदर सहा ते सात दिवस आपल्या वाहनाच्या नोंदणी संबंधातील पूर्तता (जसे की शुल्क, कर भरणे) पूर्ण करुन घ्यावी. जेणेकरुन आपणांस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक 25.03.2020 रोजी वाहन ताब्यात मिळू शकेल. वाहन खरेदी करताना कर्ज सहाय्य घेत असल्यास वाहनाची नोंदणी दिनांक 31.03.2020 पूर्वी होईल याची पक्की खात्री करावी. कोणताही वाहन उत्पादक किंवा वितरक दिनांक 01.04.2020 नंतर BS-IV (BS-4) वाहनाची विक्री किंवा नोंदणी करु शकणार नाही. वितरकाकडे विक्री न केलेल्या वाहनांबाबत फक्त दोन पर्याय उपलब्ध आहेत. 1) वाहन उत्पादकास परत करणे 2) वाहनाचे सुटे भाग वापरणे. वाहन उत्पादकाकडून तसेच शासनाकडून वाहन नोंदणी प्रणालीवर सदर वाहने ब्लॉक केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व संगणकीय प्रणालीतील केले जाणारे बदल विचारात घेता कोणत्याही प्रकारचे BS-IV (BS-4) मानकांचे वाहन दिनांक 01.04.2020 पासून नोंदणीकरिता विचारात घेतले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. वाहन प्रणालीमध्ये क्वचित प्रसंगी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास नोंदणी प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. सर्व बाबी विचारात घेऊन ग्राहकांनी आपल्या वाहनाची नोंदणी प्रक्रिया दिनांक 20.03.2020 पूर्वीच पूर्ण करावी. त्याचप्रमाणे आपले वाहन अधिकृतरित्या नोंदणी झाल्याची खातरजमा परिवहन कार्यालयात करावी जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही. पसंतीच्या कमांकासाठी वाहन नोंदणी प्रलंबित राहिल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.