सातारा- महामार्गाची दुरावस्था, वाढते अपघात आणि सोयी सुविधांची वाणवा यामुळे टोल का भरायचा? टोल बंद करावा, यासाठी आक‘मक झालेल्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्सचे अधिकारी यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती आणि सोयी सुविधा याबाबत संबंधीतांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे बुधवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता आनेवाडी टोलनाका येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली टोलबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे.
याबाबत अप्पर जिल्हाधिकारी राम शिंदे आणि पोलीस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते यांना आ. शिवेंद्रसिंहराजे समर्थक नगरसेवक अशोक मोने, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, शेखर मोरे पाटील, राजू भोसले, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य आशुतोष चव्हाण, पोपटराव मोहिते, ऍड. विकम पवार, फिरोज पठाण, राजू मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. अशी मागणी करत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा ९ नोहेंबर रोजी दिला होता. यावरच न थांबता त्यांनी रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून महामार्ग दुरुस्ती आणि आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याबाबत सकारात्मक चर्चा करुन तसे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना देण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकार्यांनी संबंधीत सर्व अधिकार्यांची बैठक बोलावून यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह टोल विरोधी सातारी जनता समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणिस, रिलायन्स कंपनीचे गांधी यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकार्यांनी १५ दिवसांत महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील खड्डे कार्पेट करुन भरले जातील असे सांगितले. १५ दिवसांत काम झाले नाही तर, आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यवेळी दिला.
मागितलेल्या वेळेत संबंधीतांनी काम पुर्ण केले नाही. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार सोमवारी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमख यांना निवेदन दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे हे अधिवेशनानिमीत्त नागपूर येथे गेले आहेत. तरिही ते बुधवारी सकाळी सातार्यात येणार असून टोलबंद आंदोलनाचे नेतृत्व स्वत: करणार आहेत. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले असून रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठे आणि अडेलतट्टू धोरणाचा निषेध केला. तिव‘ भावना व्यक्त करताना जो पर्यंत काम होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद ठेवावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. तसेच आंदोलनास टोल विरोधी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहनही समर्थकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.