शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम झाले, मात्र त्यावर कोटींगचा थर अद्याप देण्यात आला नाही. सदर बझार येथील कांगा कॉलनीमध्ये व इतर ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे, त्या कामाचा दर्जा एकदम खराब आहे. वार्ड क्रमांक १६ मध्ये ९ महिन्यांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले मात्र त्यावर कॉटिंगचा थर दिसून येत नाही. या सर्व कामांची सरकारी यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी. संबंधित ठेकेदार व त्यांची चौकशी करावी, तोपर्यंत बिले अदा करू नयेत अथवा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
शहरात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करून संबंधित ठेकेदाराची चौकशी केल्यानंतरच बिले अदा करण्यात यावीत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा सातारा शहर शिवसेनेने मुख्याधिकारी शंकर गोरे यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी बाळासाहेब शिंदे,हेमंत उबाळे राजू नाईक, सयाजी शिंदे, सर्जेराव तावडे, अजित शिंदे, सुमित नाईक आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.