शाहुपुरी भागातील विकास कामांसंदर्भात उपाध्यक्ष शेंडे यांच्या दालनात बैठक संपन्न

77
Adv

शाहूपुरी ग्रामपंचायतीने विलीनीकरणापूर्वी सुमारे अडीच कोटी रुपयांची कामे मंजूर केली होती . ही कामे सातारा पालिकेने तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी केली .

मंगळवारी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या दालनात मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या उपस्थितीत बैठक झाली . यावेळी संजय पाटील यांनी शाहुपुरी क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांची यादी उपनगराध्यक्षांना सादर केली . यावेळी संजय ढाणे, शंकर किर्दत, अमित कुलकर्णी, अजित ग्रामोपाध्ये, मंदार पुरोहित, अजित किर्दत, सुधाकर यादव, महेश मोहिते, रविंद्र राजापुरे, शाहु पुरीचे माजी सरपंच गणेश आरडे, माजी उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी, अशोक घोरपडे , राम हादगे इं यावेळी उपस्थित होते .

शाहुपुरी च्या विस्तारित आणि समाविष्ट क्षेत्रात स्ट्रीट लाईट, पक्के रस्ते, कचरा निर्मूलनासाठी जादा घंटागाडया देण्यात याव्यात याची मागणी संजय पाटील यांनी चर्चेदरम्यान केली . विस्तारित भागासाठी किमान पन्नास घंटागाडयांची गरज आहे मात्र पहिल्या टप्प्यात काही घंटागाडया नियोजित वेळेनुसार सोडाव्यात अशी मागणी त्यांनी केली . शाहु पुरी ग्रामपंचायतीने .विलिनीकरणापूर्वी अडीच कोटीची विकास कामे मंजूर केली आहेत ती तातडीने मागी लावावीत अशी मागणी केली ही कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले .

शाहुपुरी क्षेत्रात रस्त्यात येणारे तब्बल 35 वीज खांब हलवायचे आहेत . त्याची योग्य ती कार्यवाही करू शिवाय या भागात पक्के रस्ते आणि दुतर्फा गटारे तसेच नळ कनेक्शनसाठी दर तीस मीटर अंतरावर स्वतंत्र वाहिन्या टाकण्यात येतील असे उपनगराध्यक्ष शेंडे यांनी सांगत या कामांना सर्वसाधारण सभेत मंजूरी घेतली जाईल असे सांगितले . शाहूपुरी क्षेत्रासाठी सीसीटीव्ही यंत्रणेची मागणी पुढे आली त्यावेळी सातारा शहरातील बत्तीस सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाल्यावर या भागाच्या सीसीटीव्ही साठी जादा निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जाईल असे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी चर्चेदरम्यान बोलताना स्पष्ट केले .

Adv