खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचने नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील सर्व महाविद्यालये निर्जंतुकीकरण करून देणार असल्याची माहिती सातारा पालिकेचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष व शिक्षण मंडळाचे सभापती मनोज शेंडे यांनी सातारानामाशी बोलताना दिली
उपनगराध्यक्ष तथा शिक्षण मंडळाचे सभापती मनोज शेंडे यांनी आज सातारा शहरातील सर्व शाळा व कॉलेज यांची ऑनलाईन मीटिंग घेऊन सर्व माहिती घेतली यामध्ये उपनगराध्यक्ष शेंडे यांनी अशा सूचना दिल्या विद्यार्थ्यांची काळजी ही संबंधित शाळा व कॉलेजनेच घेतली पाहिजे विद्यार्थ्यांचे तापमान हे संबंधित शाळा व कॉलेजनेच रोजच्या रोज चेक केले पाहिजे तसेच शाळेने व कॉलेजने हॅन्ड सॅनिटायझर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे अशा विविध सूचना यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या ऑनलाईन मीटिंगमध्ये मुख्याध्यापकांना दिल्या यावेळी शिक्षण विभागाचे श्री भांगे उपस्थित होते
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचने नुसारच सर्व शाळा व महाविद्यालयांना सातारा पालिकेतर्फे लागेल ती मदत देणार असून उद्यापासून शहरातील सर्व शाळा व महाविद्यालय हे निर्जंतुकीकरण करणार असल्याचेही उपाध्यक्ष शेंडे यांनी यावेळी सांगितले