सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने उघडीप घेतली आहे मात्र तरीही सातारा ठोसेघर मार्गावरील बोरणे घाट परिसरातील शेवटच्या वळणावर अचानक पहाटे दरड कोसळल्याने येथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती सकाळी साडेदहाच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने मार्गावरील महाकाय दगड तात्काळ हटवण्यात आले
या घाटामध्ये दरड कोसळू नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाव्यात अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे ठोसेघर हा सातारा तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा आहे पावसाळ्यामध्ये जल पर्यटनाच्या निमित्ताने शेकडो पर्यटक सातारा ठोसेघर मार्गावरून जातानबोलणे घाटातून प्रवास करतात हा घाट वारंवार कोसळणाऱ्या दरडीमुळे धोकादायक बनला आहे हा धोकादायकपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला. मंगळवारी पहाटे अचानक डोंगर कडेची माती निसटून महाकाय दगड रस्त्यावर आले त्यामुळे सकाळच्या सत्रातील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती दगड वजनाने मोठे असल्याने हलवणे कठीण होते ठोसेघर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तात्काळ याची खबर सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली बांधकाम विभागाचे एक पथक तात्काळ घाटामध्ये रवाना झाले कर्मचाऱ्यांनी ही दरड अर्धा तासामध्ये तात्काळ हटवली आणि वाहतूक सुरळीत केली. दरवर्षी पावसाळ्यामध्ये बोरणे घाट हा दरड कोसळत असल्याने धोकादायक बनतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या घाटाची दुरुस्ती काम हाती घेण्यात आली होती मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे या कामावर मर्यादा येत होत्या. येथील जमिनीचे भू सर्वेक्षण करून तात्काळ कायमस्वरूपी उपाय योजना राबवल्या जातील आणि प्रवासासाठी हा घाट सुरक्षित केला जाईल अशी माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे