अतिवृष्टीमुळे सातारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यापासून खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येमुळे सातारकर नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. आता पावसाने उघडीप दिली असून आचारसंहिताही शिथील झाली आहे. त्यामुळे नागरिकांची
गैरसोय टाळण्यासाठी तातडीने सातारा शहरातील रस्त्यांची कामे सुरु करावीत, अशा सक्त सुचना आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान, सातारा तालुका आणि जावली तालुक्यातही रस्त्यांची दुरावस्था झाली
असून याही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा आणि जावली बांधकाम विभागाला सुचित केले आहे.सातारा शहरात ग्रेड सेपरेटरचे काम सुरु असून हे काम चालू झाल्यापासून काही ठराविक रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला होता. त्यातच अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आणि खड्डयांमुळे
नागरिक आणि वाहनचालकांचे हाल सुरु झाले. पावसाळ्यात रस्त्यांची कामे सुर करता येत नाहीत तसेच निवडणूक आचारसंहितेमुळेही कामे सुरु करता आली नाहीत. आता पावसाने उघडीप दिली असून आचारसंहिताही शितील झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने सातारा शहरातील रस्त्यांची कामे हाती घेणे आवश्यक आहे. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेच्या
मुख्याधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या असून तातडीने रस्त्यांची कामे सुरु करा. तसेचनगरोत्थानमधून सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मंजूर झालेल्या ५० कोटी निधीचा तातडीने विनियोग करावा. सदर रस्त्यांच्या कामाची निविदा व अन्य शासकीय सोपस्कार त्वरीत पुर्ण करुन
उपलब्ध निधीतून लवकरात लबकर काँक्रीट रस्ते तयार करुन नागरिकांसाठी दळणवळणाची दर्जेदार सोयउपलब्ध करावी, अशी सक्त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली.जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे सातारा शहरासह सातारा तालुका आणि जावली तालुक्यातीलरस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे संपुर्ण मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हातीघ्यावीत आणि लवकरात लवकर रस्त्यांची कामे पुर्ण करुन जनतेची गैरसोय थांबवावी, अशा सुचनाही आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुका आणि जावली तालुका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाकेल्या आहेत. सातारा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांची कामे
बांधकाम विभागाने त्वरीत सुरु करावीत आणि कामे दर्जेदार करावीत. यासंदर्भात तातडीने उपाययोजना
व्हावी. यासाठी काय पावले उचलली याचा लेखी अहवाल तयार करावा. रस्त्यांच्या सुविधेबाबत
हलगर्जीपणा करुन नागरिकांचा त्रास वाढेल असे कृत्य प्रशासनाकडून होवू नये, याची खबरदारी घ्यावी,
अशी सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच रस्त्यांची कामे दर्जेदारहोण्यासाठी नागरिकांनीही कामांवर लक्ष ठेवून रस्ते कसे दर्जेदार होतील याबाबत जागरुक रहावे, असेआवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
अतिवृष्टीमुळे सातारा तालुका आणि जावली तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच भागात शेतीचे आणि भात, सोयाबीन, स्ट्राबेरी आदी पीकांचे नुकसान झाले आहे. न भरुन येणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाला असून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात आ.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून तातडीने भातशेती, सोयाबीन,
स्ट्रॉबेरी आदी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून तातडीने व्हावेत आणि शेतकऱ्यांनानुकसान भरपाई द्यावी, अशीमागणी ना. पाटील यांच्याकडे केली. याची दखल घेवून ना. पाटील यांनी लगेचच जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दूरध्वनी करुन पीक नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शासनाकडे
अहवाल पाठवण्याच्या सुचना केल्या आहेत.