: विधानसभा- 2019 सार्वत्रिक निवडणूक व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या अनुषंगाने 256 – वाई, 257 – कोरेगांव, 259 – कराड उत्तर, 260 – कराड दक्षिण, 261 – पाटण, 262 – सातारा तसेच 45- सातारा लोकसभेची पोटनिवडणुकीचे मतमोजणी सातारा येथील एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. तसेच या गोदामाध्यमे मतदान यंत्रे ठेवण्यात आली असून या यंत्रांची अंतिम तपासणी करण्यात येत आहे या कामांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी प्रत्यक्ष पहाणी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी संजय आसवले, संजय पवार, दिपक खरमाटे, पी.यु. मस्के उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या गोदांबरोबर जे शिल्लक मशीन ठेवायचे आहेत, त्या तीन गोदामांचीही यावेळी पहाणी केली. स्वच्छतेबरोबर काही दुरुस्ती असले तर तेही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघासाठी 5 हजार 502 बॅलेट युनिट, 3 हजार 917 कंट्रोल युनिट व 4 हजार 176 व्हीव्हीपॅट मशिन आठ विधानसभेच्या निवडणुकीसाठी वाटपाचे काम सुरु होणार आहे. तसेच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 3 हजार 500 बॅलेट युनिट, 3 हजार कंट्रोल युनिट व 3 हजार 200 व्हीव्हीपॅट मशिन्स उपलब्ध झालेले असून त्यांचेही वाटप विधानसभा निहाय करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांनी सांगितले.
0000