Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Satara City छ उदयनराजे यांच्या सूचनेनुसार 15दिवसात शाहूकला मंदिर सुरू होणार उपाध्यक्ष शेंडे

छ उदयनराजे यांच्या सूचनेनुसार 15दिवसात शाहूकला मंदिर सुरू होणार उपाध्यक्ष शेंडे

469
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या रंगकर्मींची अस्वस्थता लक्षात घेऊन गेल्या वर्षभरापासून नूतनीकरणाच्या कारणासाठी बंद असलेले शाहू कला मंदिर पंधरा दिवसात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . उदयनराजे यांनी शुक्रवारी थेट दिल्लीवरून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना हे आदेश दिले आहेत .

शाहू कला मंदिर सुरू करण्यासंदर्भात झालेल्या हालचालींमुळे साताऱ्याचे रंगकर्मी सुखावले आहेत . उदयनराजे यांच्या सूचनेवरून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी थेट स्थावर जिंदगी विभागाला पाचारण करून शाहू कला मंदिरात सुरू असलेल्या कामांचा तत्काळ आढावा घेतला . सातारा शहराच्या सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ म्हणून शाहू कला मंदिराची मोठी ओळख आहे . मात्र हे रंगमंदिर नूतनीकरणाच्या निमित्ताने गेले वर्षभर बंद राहिल्याने रंगकर्मी मध्ये मोठी अस्वस्थता होती . शाहू कला मंदिर तत्काळ सुरू करण्यासाठी सर्व रंगकर्मीनी एकत्र येऊन नगराध्यक्ष माधवी कदम यांना निवेदन सादर केले होते . शाहू कला मंदिर बंद असल्याने नाटय वेडा सातारकर प्रेक्षकांनाही चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते . साताऱ्याची नाट्यचळवळ गेल्या आठ महिन्यापासून बंद राहिल्याने कलावंतांच्या उपजीविकेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता .स्टेज व फर्निचर यांचे काम झाल्यावर या कामाचा उपकंत्राटदार गायब झाल्याने नूतनीकरणाचे काम आणखीनच लांबणीवर पडल्याने शाहू कला मंदिर पुन्हा नव्याने कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती .

मात्र या अनिश्चिततेची कोंडी खासदार उदयनराजे भोसले यांनी च फोडली . शुक्रवारी पालिकेत दुपारी नेहमीचे कामकाज सुरू असताना उदयनराजे यांनी थेट दिल्लीवरून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना फोन करून येत्या पंधरा दिवसात शाहू कला मंदिर तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या . मनोज शेंडे यांनी तत्काळ स्थावर जिंदगी विभागातून शाहू कला मंदिराच्या झालेल्या कामाची माहिती घेतली आणि पुढील दोन आठवड्यात शाहू कला मंदिर तातडीने सुरू करण्याची ग्वाही उदयनराजे यांना दिली .. ज्येष्ठ रंगकर्मी यांनी पालिका प्रशासनासह उदयनराजे भोसले यांचे आभार मानले आहेत . शाहू कला मंदिराचे दोन अडीच लाखाचे उत्पन्न पालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत आहे . शाहू कला मंदिराच्या देखभालीसाठी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून शाहू कला मंदिर सुरू झाल्यास त्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार असून पालिकेच्या तिजोरीवरील ताण कमी होणार आहे

Adv