Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Satara City हद्दवाढीच्या भागासाठी ८ कोटींचा निधी मंजूर छ उदयनराजे यांच्या पाठपुराव्याला यश

हद्दवाढीच्या भागासाठी ८ कोटींचा निधी मंजूर छ उदयनराजे यांच्या पाठपुराव्याला यश

769
Adv

जिल्हा नागरी दलित वस्ती योजना अंतर्गत सातारा नगरपरिषदेला सव्वा ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला आहे. या निधी मधुन सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढ झालेल्या भागासह, विविध ठिकाणच्या दलित बस्त्यांमध्ये विविध प्रकारचे रस्ते, गटर्स, संरक्षक भिंत, इत्यादी लोकोपयोगी
महत्वाची मुलभुत विकास कामे लवकरच हाती घेवून पूर्ण करण्यात येतील अशी माहीती राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

जिल्हास्तरावरील जिल्हा नागरी दलित वस्ती योजनेमधुन सातारा नगरपरिषदेस मोठा निधी मिळावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले. सातत्याच्या पाठपुरावा आणि जिल्हयाचे पालक मंत्री ना.बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा मोठा निधी नगरपरिषदेला मिळाला आहे असे सांगुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, वाढीव हद्दीसह सातारा शहरात मागासवर्गीय दलित वस्त्या आहेत. येथे मुलभुत सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातुन ५ टक्के राखिव निधीसह सर्वसाधारण निधी विनियोगात आणुन अनेक कामे मार्गी यापूर्वीच लावली
आहेत.उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हास्तरीय जिल्हा नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही जाणिवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे एकाच वेळी सुमारे सव्वा आठ कोटींचा निधी नगरपरिषदेला मिळालेला आहे.

नागरी दलित वस्त्यांचा विकास झाला पाहीजे या भावनेतुन यापूर्वी आमच्या स्थानिक विकास निधीमधुन संपूर्ण जिल्हयातील महत्वाच्या व आवश्यक त्या ठिकाणी विविध विकास कामे उभारलेली आहेत.लवकरच सातारा शहरातील बाढीव भागासह दलित/मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मंजूर झालेल्या सव्वा आठ कोटींमधुन, उपयुक्त कामे विहित पध्दतीने हाती घेण्यात येवून कार्यान्वित करण्यात येतील असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv