सातारा, दि. – सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे शौर्य अतुलनीय होते. त्यांना कर्तबगार घराण्याचा वारसा लाभला होता. सरसेनापती म्हणून त्यांनी स्वराज्याची पताका चहुबाजूंना फडकावत ठेवली. त्यांच्या कार्याची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसांमध्ये आदराची भावना आहे. त्यांच्या समाधीस भेट देऊन प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असे आवाहन शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री.छ. वृषालीराजे भोसले यांनी केले
तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या शाहुनगरी फाऊंडेशनच्या स्थापनाच इतिहासातील थोर पराक्रमी लोकांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहचावे यासाठी झालेली आहे. त्यादृष्टीने कार्य सुरु असून विविध उपक्रम राबविले जात आहेत. हंबीरराव मोहिते यांनी श्री.छ. शिवाजी महाराज आणि श्री.छ. संभाजीराजे यांच्या काळात सरसेनापती पद सांभाळले. त्यांनी विविध लढायामधून अतुलनीय शौर्य गाजवले. स्वामीनिष्ठा काय असते हे कृतीतून दाखवून दिले. त्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसांमध्ये आदराची भावना आहे. प्रत्येकाने त्यांच्या निष्ठेचे वारसा जतन केला पाहिजे. त्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात असलेले तलवार होय. अशा या पराक्रमी शूरवीरांच्या समाधीस शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री.छ.वृषालीराजे भोसले आणि पदाधिका-यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी समाधी सेवा समितीकडून सध्या सुरु असलेल्या उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे त्यांचे कार्य जास्तीत जास्त नवीन पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली आणि त्यादृष्टीने लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी सुशांत मोरे, निलेश झोरे, विक्रम क्षीरसागर, उमेश मोहिते, विनोद मोहिते, विशाल मोहिते, भीमराव मोहिते, राजेंद्र मोहिते, श्री.सचिन शहा, श्री. वैभव वाघमारे, प्रताप मोहिते, कुणाल मोहिते, ॠषिकेश मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी सेवा समितीचे सदस्य आणि तळबीड ग्रामस्थ उपस्थित होते.
Home Satara District सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस अभिवादन करताना श्री.छ. वृषालीराजे व फाऊंडेशनचे सदस्य







