Thursday, April 16, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती फिस्कटली

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती फिस्कटली

112
Adv

महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्या आदीच सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती फिसकटली आहे ? महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी नेत्यांच्या वक्तव्यावरनं एकंदरीत महायुती फिस्कटली असल्याचे दिसून येते

पंचायत समिती जिल्हा परिषदेला महायुती कोणामुळे फिसकटली हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र जिल्ह्यात महायुती होणार नाही? हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने दाखवून दिले

कालच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपचा उल्लेख न घेता जातीयवादी पक्षाच्या हातात जिल्हा परिषद आपल्याला द्यायची नाही त्यामुळे सर्वांनी जिल्हा निवडणुकीसाठी तयार राहावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत

एक भाजप खासदार एक राष्ट्रवादी खासदार भाजपचे दोन राष्ट्रवादीचे एक व शिवसेनेचे एक असे जिल्ह्यात महायुतीचे मंत्री आहेत मात्र आता जिल्ह्यात नक्की कोणत्या पक्षाचे वर्चस्व हेच दाखवण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातल्या सत्तेत फक्त आपण महायुतीत आणि ग्राउंड लेव्हलला बाकी स्थानिक कार्यकर्ते अजून महायुतीत नसल्याचे स्पष्ट दिसून येते

प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने कार्यकर्त्यांच्या नाराजी असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावरच लढण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला गळ घातली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेवर बाजी कोण मारणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार हे नक्की

Adv