भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक आहे. आणि यामध्ये कुठल्याही स्थरावर पैशांची देवाण घेवाण होत नाही. भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुठल्याही दलालांची आवश्यकता नाही. दलाल किंवा कुठलीही मध्यस्थ व्यक्ती सैन्यामध्ये भरती करु शकत नाही.
सैन्यात भरती करण्यासाठी कुणीही व्यक्ती किंवा दलाल पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी करत असेल तर आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.