सातारा रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म 167 मीटरने वाढणार खा. छ. उदयनराजे भोसले यांची माहिती

602
Adv

सातारा ते मिरज या मार्गावरील रेल्बे रुळाचे दुहेरीकरणाचे काम गतीने सुरु आहे. या कामामध्येच शिवप्रभुंच्या पदस्पशनि पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा रेल्वस्टेशन इमारतीच्या प्रथम दर्शनी भागावर युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे निवडक चरित्र प्रसंगाचे चित्रण करण्याबरोबरच पुण्याकडे जाणा-या प्लॅंटफॉर्मेची लांबी १६७ मिटरने वाढवणे, सोलर सिस्टीम उभारणे, पादचारी ओव्हरब्रिज, रेल्बे माल शेडचा विकास करणे इ. लोकहिताची कामे सुचवलेली होती, रेल्बे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी तातडीने लोहमार्ग दहरीकरणाचे कामात याकामांचा समावेश करुन, सदरची कामे मार्गी लावली आहेत. लवकरच या कामांची सुरुवात करण्यात येईल अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा रेल्बे स्थानक हे नॉन सबर्बन ग्रेड-५ या दर्जाचे आहे. याठिकारणी किमान आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दर्जेदारपणे रेल्वेप्रवाशांच्या मिळणेकामी आम्ही नेहमीच सतर्क असतो असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढ़े नमूद केले आहे की,यापूर्वी आमच्या संसद कार्यकाळात, सातारा रेल्वेस्टेशनचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तसेच सातारा रेल्बेस्टेशन हे आदर्श स्टेशन या योजनेमध्ये असल्यामुळे त्यामाध्यमातुनही अनेक चांगली कामे मार्गी लावण्यात आली
आहेत. यामध्ये रेल्वेस्टेशनमधील मिरज कड़े जाणा-या प्लॅंट फॉर्मची उंची आणि लांबी बाढवणे, प्लॅटफॉर्मवर शेड उभारणे,
पिण्याच्या पाण्याचे सर्व वॉटर स्टॅन्डस् चे नुतनीकरण करणे, ट्रॉली वाहन नेण्यासाठी पाथवे, स्टेशनच्या बाहेर स्मारकीय
ध्वज उभारणे, स्टेशनच्या बाहेरील आवारातील डांबवरीकरण, विस्तीर्ण पार्किंग, आवारात गतीरोधक ही कामे महत्वाची
कामे करण्यात आली आहेत. वेटींगरुम, क्लॉकरुम, पार्सल कार्यालय, कॅन्टीन सुविधा,आर्दीचे नुतनीकरण आणिसातत्यपूर्ण निगा राखली जात आहे. तसेच वन विभागाच्या सहकार्यनि स्टेशन इमारतीला विशेष रंगसंगती साधतरंगकाम करण्यात आले आहे.सातारा ही ऐतिहासिक भुमी आहे. सर्व व्यक्तींचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्त्रोत आहेत त्यामुळे रेल्वेस्टेशनवर स्टेशन इमारतीच्या प्रथमदर्शनी भागावर शिव चरित्रातील काही प्रसंगांचे चित्रण करणेवाबत आणि अन्य विकासकामांबाबत विशेष विनंती सूचना आम्ही रेल्वे राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे यांना केली होती. त्यांनीही सध्या रेल्वेच्या लोहमार्गाचि दहेरीकरणाचे काम गतीने सुरु आहे,त्या कामामध्येच शिवप्रसंगांचे चित्रण करणे,रेल्वेस्टेशनवर सौर उर्जा निर्मितीचे सोलर पनेल उभारणे, पुण्याकडे जाणा- या दिशेला रेल्वेचे प्लॅटफॉर्म १६७ मिटर लांबीने वाढवणे, पादचारी ओव्हरब्रिज उभारणे आणि मालशेड्चे विकसन करणे आदी कामांचा समावेश करुन, आमच्या सूचनांप्रमाणे जनहिताच्या कामांची अंमलबजावणी केली आहे,सदरची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. रेल्वे सुविधांचा जास्तीत जास्त लाभ प्रवाशांनी घ्यावा असेही आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

Adv