सातारा जिल्ह्यात सातारा ते लातूर राज्य महामार्ग 141 चे काम म.रा. र.वि. म.पुणे यांचे देखरेखी खाली चालू असून या कामाची निविदा प्रमाणे 31 जुलै 2019 रोजी मुदत संपली आहे.तरी हे मुदतबाह्य काम चालूच होते सध्या हे काम कोरोनो सारख्या वैश्विक संकटामुळे काम बंद होते. परंतु राज्य शासनाने नुकतेच बांधकामना दिलासा दिलेने हे मुदतबाह्य रस्ता नुतानिकरणाचे काम सुरु करनेचा घाट म.रा. र.वि. म.पुणे आणि संबधित ठेकेदार कंपनी यांनी घातला आहे. परंतु या कामावर माण आणि खटाव तालुकयांच्या हद्दित काल पासून अचानक शेकडो मजूर आलेने कोरोनो च्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्तिथ झाले आहेत.
सध्या हे काम माण आणि खटाव तालुक्यात सुरु असून या कामावर कालपासून अचानक शेकडो मजूर आलेने कोरोनो च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असताना एवढे मजूर कामावर आले कसे ? त्यांचा प्रवास कुठून कसा झाला ? त्यांच्या वैदेयकीय चाचणी झाली का?असे अनेक प्रश्न उपस्तिथ झाले आहेत.सध्या माण आणि खटाव तालुक्यात स्थानिक प्रशासनच्या योग्य नियोजनामुळे एक ही कोरोनोचा रुग्ण नाही परंतु या सातारा लातुर कामा वरील शेकडो स्थलांतरित मजूर यांचेमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत आहेत. ठेकेदार कंपनी च्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संभाव्य धोके होऊ शकतात.
तसेच या रस्तेकामी सातारा जिल्ह्यातील ऐकुन 3559 वृक्षतोड़ करण्यात आली परंतु वनविभाग कडील आदेशानुसार ऐकून दोन वर्ष होऊन ही कोणत्या ही प्रकारची वृक्ष पुनर्लगावड करण्यात आली नाही, यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.ठेकेदार कंपनी मुदतीत हे काम पूर्ण करु शकली नाही. ठेकेदारच्या हलगर्जीपनामुळे अनेक नागरिकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे . तरी कोणत्या ही प्रकारची फेर निविदा न झालेले हे काम आणि कोरोनो च्या संदर्भानुसार नियमबाह्य कामगार कामावर ठेवेलेने संबधितवार त्वरित कारवाई करुण योग्य त्या उपाययोजना कराव्यात.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.