पुसेगाव यात्रेदरम्यान 21 ते 31 डिसेंबर अखेर वाहतूक मार्गात तात्पुरता बदल  -पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

125
Adv

खटाव तालुक्यातील पुसेगांव येथील श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.  यात्रेदरम्यान पुसेगाव येथे वाहनांची गर्दी होवुन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे  सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांना असलेल्या अधिकारान्वये पुसेगाव व परिसरातील रस्त्यावरील वाहतूकीत  21 ते 31 डिसेंबर या कालावधीत तात्पुरता बदल केला आहे.

                एस.टी.बस खेरीज माल वाहतुक व अवजड वाहनांना विसापुर फाटा ते कटगुण मार्गावर पुढीलप्रमाणे प्रवेश बंद राहील. दहिवडी बाजूकडुन येणारी वाहने पुसेगावकडे न येता पिंगळी फाट्यावरुन वडुज चौकीचा आंबा मार्गे साताराकडे जातील. वडुज बाजुकडुन येणारी वाहने पुसेगावकडे न येता चौकीचा आंबा मार्गे साताराकडे जातील. सातारा बाजुकडुन येणारी वाहने पुसेगाव गावात न जाता नेर फाटा, बुध, राजपुर मार्गे दहीवडीकडे जातील.  फलटण बाजूकडून वडुजकडे जाणारी वाहने बुध, राजपुर मार्गे दहिवडीकडे जातील. सातारा बाजुकडून ऊस वाहतूक करणारी वाहने यांनी पुसेगाव गावात न येता विरापुर फाटा चौकीच्या आंबा मार्गे पळशीकडे जातील.
                इतर वाहनांना प्रवेश बंद व नो पार्कींग बदल पुढील प्रमाणे राहील.  वडूज रोडवरील बंद राजवर्धन ढाब्याकडून शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता राज्य परिवहन बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.  तसेच वडूज रोडवरील सेवागिरी विद्यालयाकडे जाणेकरीता सर्व वाहनांना  प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.  विसापूर फाट्याकडून शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता राज्य परिवहन बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.  शिवराज कार्यालयाकडून शिवाजी चौकाकडे राज्य परिवहन बसेस वगळून येणारे सर्व वाहनांना प्रवेश करणेस बंदी घालणेत आली आहे.  फलटण रोडकडून प्रस्तावित एस.टी. स्टँड पासून शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता राज्य परिवहन बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेश करणेस बंदी घालणेत आलेली आहे. या सर्व मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सर्व वाहनांना नो-पार्किंग झोन करणेत आलेला आहे.  शिवाजी चौक पुसेगांव येथुन दहिवडी बाजुकडे, फलटण बाजुकडे, वडूज बाजुकडे(चौकापासून चारही बाजूस) व सेवागिरी मंदिरापासून दोन्ही बाजूस 200 मीटर अंतरापर्यंत नो पार्कींग झोन करण्यात आलेला आहे.
                21 डिसेंबर  रोजी 7  ते दुपारी 3 वा. तसेच 24 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 27 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आलेला आहे.  सातारा बाजुकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगांव गावात न जाता नेर, राजापरू, कुळकजाईमार्गे दहिवडीकडे जातील व दहिवडी बाजूकडून येणारे वाहने कटगण, खटाव, खातगूण, जाखणगांव मार्गे  औंधा फाट्याकडे विसापूर मार्गे साताराकडे जातील. वडूज बाजुकडून फलटण बाजुकडे जाणारी वाहने पुसेगांव  गावात न चयेता खटा, जाखणगांव, आँध फाटा , नेर ललगूण मार्गे फलटणला जातील. तसेच फलटण बाजुकडून वडूज बाजुकडे जाणारी वाहने नेर, ललगूण, औंध फाटार,जाखणगाव, खटाव मार्गे वडूजकडे जातील. दहिवडी ते डिस्कळ जाणारी व येणारी वाहतूक निढळ, मलवडी, राजापुर मार्गे जातील.
                वरील वाहतूकीच्या बदलाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अधिसुचनेनुसार केले आहे.

Adv