पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बायोमेडिकल वेस्ट पुण्याच्या आसपास प्लान्ट सोडुन सातारा नगर परिषदेच्या प्लांटला पाठवण्यास कोणी परवानगी दिली शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुट्टी असताना नेमके त्याच दिवशी आणि रात्रीच्या वेळेसच पुणे महानगरपालिकेच्या मालकीचे हे ट्रक का आले त्याला आयुक्तांनी परवानगी दिली कशी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात जिल्हा बंदी असताना अत्यावश्यक आणि असलेल्या व्यक्ती वाहन शिवाय अन्य कोणास परवानगी नसताना अशा परिस्थितीत शिरवळ वरून हे ट्रक सातारा जिल्हा हद्दीत कसे आले शिरवळ चेक पोस्ट वरील संबंधित पोलीस अधिकारी जिल्हा प्रशासन यांनी कोणती चौकशी करून सदरचे ट्रक सोडले बायोमेडिकल वेस्ट सारख्या सेन्सिटिव्ह प्रश्नाबाबत पुण्याच्या आणि सातारच्या माननीय पालकमंत्री महोदयांना माहिती देण्यात आली होती का या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी करून दोषी कोणीही असो त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली आहे
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना आमच्या नेत्यांसह सातारकर नागरिकांच्या भावनांशी आजपर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी नगरसेवक कधीही खेळलो नाही सातारकर नागरिकांचे प्रतारणा करणे आमच्या नेत्यांच्या आणि आमच्या रक्तात नाही असे नमूद करून उपनगराध्यक्ष शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद केले आहे की सातार नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असलेल्या कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांच्या कार्यकाळातच पाठीच्या मैला वाहतुकीच्या प्रथेला आळा घालण्यात आला 2002 साली सातारा विकास आघाडीच्या एकहाती सत्ता आल्यावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या इतिहासात कचरा कुंडी मुक्त शहर ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली शहरात कचरा साठुच नये म्हणून घरोघरी जाऊन कचरा उचलल्या करता घंटागाड्या सुरू केला मंडई सारख्या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉली कचरा उचलण्यास सुरुवात केली टप्प्याटप्प्याने आरोग्य विभागाकरिता नवीन टेंपर प्लेझर जेसीबी खरेदी केली बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल प्लांट नेचर इन नीडचे सहकार्याने उभारण्यात आला घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा डेपोवर कचरा विलगीकरण करणे कचऱ्यापासून खत निर्माण करणे कचरा डेपोच्या जागेला सर्व बाजूने कंपाऊंड बांधणे अशी विविध कामे लोकहित डोळ्यासमोर ठेवून सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत
कचरा शहरात ठिकठिकाणी साठुच नये अशी संकल्पना राबवली त्यावेळी महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या नगरपालिकांमध्ये सातारा नगरपरिषद अग्रक्रमाने समावेश होतो सातारा विकास आघाडीने सुरू केलेल्या अभिनव उपक्रम पुढे यशस्वी ठरले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोक हित लक्षात घेऊन राबवलेल्या या उपक्रमांमधून नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्य विषयी असणारी तळमळ काळजी स्पष्टपणे दिसून येते सातारा विकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी अशा सुविधा सातारकर नागरिकांना मिळू लागल्या
श्रीमंत छत्रपती दादा महाराज रुग्णालय गोडोली यांच्याकडील असणाऱ्या मेडिकल ऑफिसर व स्टॉप दारे घरोघरी जाऊन covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण औषध उपचार जरूरीप्रमाणे मोफत करण्यात येत आहेत आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे, नगर परिषदेच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत अनेक ठिकाणी संस्था विलगीकरण याची व्यवस्था नगरपरिषदेचे कर्मचारी सेवा बजावत आहेत शहर हद्दीतील सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणे बरोबरच शहराला लागून असणारी उपकरणे नगरे तसेच हद्दीबाहेरील अनेक ठिकाणी मानवतेच्या भावनेतून जी लागेल ती सेवा नगरपरिषदेच्या माध्यमातून दिले आहे केवळ सातारकर नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहावे म्हणूनच या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवले गेले आहेत त्यामुळे सातारकरांच्या भावना ऐकून या पुणे महानगरपालिकेच्या बायोमेडिकल वेस्ट आणले गेले आहे त्याची चौकशी केली जाऊन सातारा जिल्हा प्रशासन पुणे महानगरपालिका प्रशासन यांनी व पुण्याचे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तात्काळ खुलासा वजा स्पष्टीकरण करावे व संबंधितांवर कडक कायदेशीर करावी अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने सातारा विकास आघाडीने केली आहे असेही उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी शेवटी नमूद केले आहे