पोवई नाक्यावरील रस्ते वाहतूकीसाठी तत्काळ खुले करा आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सुचना

55
Adv

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील इतर रस्त्यांवर वाहतूकीचा ताण वाढला आहे. पोवई नाका हे शहराचे मु‘य ठिकाण आहे. याठिकाणीच रस्ते बंद असल्याने विशेषत: शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच व्यापारी आणि नागरिकही वैतागले आहेत. ग‘ेड सेपरेटरचे काम पुर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोवई नाक्यावरील काम पुर्ण असलेले रस्ते वाहतूकीसाठी तातडीने खुले करावेत, अशा सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.

याची दखल घेवून पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय, पोवई नाका ते सयाजीराव महाविद्यालय, पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय आणि पोवई नाका ते बस स्टँड जाणारे रस्ते येत्या दोन- तीन दिवसांत पुर्ण क्षमतेने खुले करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पोवई नाका येथे ग‘ेड सेपरेटरच्या कामामुळे येथील रस्ते बंद आहेत. रस्ते बंद असल्यामुळे व्यापरी आणि खास करुन विद्यार्थी आणि त्यांना ने-आण करणारे वाहनचालक व दुचाकीस्वार, महिला यांची मोठी गैरसोय होत होती. आजमितीला ग‘ेड सेपरेटरचे बोगद्यांचे काम पुर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने वरील रस्ते वाहतूकीसाठी खुले झाल्यास नागरिकांची गैरसोय टळेल, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जावून अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी अधिक्षक अभियंता एस. एन. राजभोज, कार्यकारी अभियंता शंकरराव दराडे, उत्तुरे, उपभियंता के.जी. निकम, शाखा अभियंता राजकुमार आंबेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, मक्तेदार शिवाजी थोरवे आदी उपस्थित होते.

ग‘ेड सेपरेटरच्या कामामुळे दुचाकीस्वार आणि विद्यार्थ्यांना ने- आण करणार्‍या वाहनांची मोठी गैरसोय होत आहे. आता बर्‍यापैकी काम होत आले असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोवई नाक्यावरील रस्ते खूले करणे आवश्यक आहे. तसेच याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात मुरुम, खडी टाकली जात आहे. ती व्यवस्थील रोलींग करुन रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. त्यांच्या सुचनेनुसार पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय, पोवई नाका ते सयाजीराव महाविद्यालय, पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय आणि पोवई नाका ते बस स्टँड जाणारे रस्ते येत्या दोन- तीन दिवसांत पुर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. दरम्यान, आ. शंभूाज देसाई घर, मरिआई कॉम्पलेक्स ते पोवई नाका याठिकाणचा रस्ता व्यवस्थित रोलिंक करावा, याठिकाणीच वाहतूकीचा जास्त ताण आहे. याठिकाणी वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली. याबाबतही अधिक्षक अभियंता राजभोज यांनी संबंधीत अधिकार्‍यांना खबरदारी घेण्यास सांगितले.

दरम्यान, ग‘ेड सेपरेटरचे उर्वरीत काम सुरु असुद्या पण बस स्टँड ते कोरेगाव, पोवई नाका ते नगर पालिका व काम पुर्णत्वास आलेल्या ठिकाणचे रस्ते खुले करण्याची सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. तसेच खडीकरण आणि रोलिंगसाठी वेळ लावू नका, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे रस्ते खुले होणार असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. काम चांगले करा, गडबड करुन दर्जाबाबत तडजोड करुन नका, अशा सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्‍यांना केल्या. बहुचर्चीत मोळाचा ओढा, शाहुपूरी ते दिव्यनगरी आणि जावलीतील मेढा पवन उर्जामधील म्हाते मुरा, पाटने माची आणि मान्टी रस्ता याबाबतही चर्चा झाली आणि हे रस्तेही तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्‍यांना यावेळी केल्या.

अतिक‘मण हटवण्याचे राजभोज यांचे आदेश
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या बैठकीनंतर अधिक्षक अभियंता राजभोज यांनी उपस्थित अधिकार्‍यांना पोवई नाका, तहसिलदार कार्यालय ते बस स्थानक मार्गावरील अतिक‘मणे हटवण्याच्या सुचना केल्या. याबाबत पोलीस संरक्षण घेवून तातडीने अतिक‘मणे हटवा आणि रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावा. तसेच रस्त्याच्या कडेला गटर आणि त्यावर एक मीटर अंतराने लोखंडी पोल टाका, जेणेकरुन पुन्हा अतिक‘मण होणार नाही, असा आदेश राजभोज यांनी अधिकार्‍यांना दिला असून त्यानुसार लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.      

Adv