वाठार स्टेशन मध्ये उद्या दिग्गज नेत्यांची सभा

33
Adv

वाठार स्टेशन गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोसले यांच्या प्रचारानिमित्त मंत्री मकरंद पाटील माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राज्यसभा खासदार नितीन पाटील या दिग्गज नेत्यांची सभा होणार आहे

जयश्री भोसले यांच्या प्रचार निमित्त दिग्गज नेत्यांची जिल्ह्यात पहिलीच सभा होत असून या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे जयश्री भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा विजय हा एकतर्फी असल्याचे बोलले जात आहे

जयश्री भोसले यांची जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची ही दुसरी वेळ त्यामुळे सौ जयश्री भोसले यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव असून जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने ऐनवेळी त्यांची वर्णी लागू शकते असे या मतदारसंघात बोलले जात आहे

Adv