श्रीमंत रामराजे यांच्या यांच्या स्टेटसची जिल्ह्यात चर्चा

688
Adv

आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने म्हसवडला एमआयडीसी मंजूर झाली असून या प्रश्नी माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका काय असा प्रश्न आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवून विचारला आहे

आमदार जयकुमार गोरे हे म्हसवड येथे एमआयडीसी व्हावी यासाठी प्रयत्नशील होते त्याला मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार गोरे यांनी कालच दिली होती याप्रकरणी त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही टीकास्त्र पुढे सोडले होते मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअपला स्टेटस ठेवून एक प्रकारे माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच प्रश्न विचारला असल्याचे दिसून येते

उत्तर कोरेगाव येथे एमआयडीसी होण्यासाठी आपण प्रयत्न केले सत्ते पुढे शहाणपण नाही आपण हार मानायची नाही आपल्यातला विश्वासघाती व्यक्ती कोण हे ओळखा?परंतु एमआयडीसी प्रकरणी लवकरच मीटिंग बोलवणार असल्याचे स्टेटस ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज दुपारी ठेवल्याने एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा चिघळणार असल्याचे चित्र दिसत आहे

Adv