२९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी ६ कोटी ६१ लाखांचे प्रस्ताव

221
Adv

कोणत्याही जिल्हयातील ग्रामिण भाग हा देशाच्या विकासाचा कणा आहे. ग्रामिण भाग हा अन्नदाता म्हणूनही ओळखला जातो, म्हणूनच ग्रामिण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी शुध्द पाणीप्रवठा व्हावा या
भावनेतुन, केंद्राच्या ग्रामीण पाणीप्रवठा विभागाकड़ील जल जीवन मिशन योजनेमधुन, सातारा तालूक्यातीलयोजना, कराड तालुक्यातील ७, महाबळेश्वर तालुक्यातील १३ तर फलटण तालुक्यातील एक योजना अश्या एकूण २९ गांवाच्या, रुपये ६ कोटी ६१ लाख अंदाजित रक्कमेच्या नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

या योजनांकरीता कैंद्र शासनाकडून लवकरच निधी उपलब्ध होईल अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकताच विविध शासकीय अधिका- यांच्या बैठकीतलोकहिताची कामे प्राधान्याने करावीत अश्या सूचना दित्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशन योजनेबाबत प्रस्तावित केलेल्या विविध कामांबाबत माहीती देताना खासदार श्रीमंत छत्रपर्ती उदयनराजे भोसले यांनी पुढ़े नमुद केले आहे की, जल जीवन मिशन योजने अंतर्गत सातारा तालुक्यातील बोरणे, कारंडवाड़ी, नागेवाडी,साबळेवाडी,तासगांव(ब्राम्हणवाडी), तासगांव (मुळीकवाडी), वडुथ, वेळे या गावांच्या पारणीप्रवठा योजनो प्रस्तावित आहेत. कराड तालुक्यातील आटके, कारवे ख़ुबी,शेरे, संजयनगर, वारुंजी, तसेच महाबळेश्वर तालुक्यातील हाथलोट, कुमठे,लामज, माचूतर, मोर्णी, रामेघर, सौदरी, वसोळीदेव, बसोळीदेव-कोळी, वाळणे-आवळण, वाळणे, येरणे बद्ुक, येरणे-खर्द, आणि फलटण तालुक्यातील विंचुर्णी या २९ गावां योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. या पैकी बहुतांशी योजनांची अंदाजपत्रके पूर्ण झाली आहेत आणि योजना प्रगतीपथावर आहे. या योजनांमधून सुमारे ४७ हजारापेक्षा जास्त ग्रामिण भागातील लोकसंख्येला शुध्द आणि स्वच्छपाणी पुरवठा होणार आहे. बहुतांशी आजार अशुध्दपाणी पोटात गेल्याने होत असतात असे वैद्यकिय संकेत आहेत.
त्यामुळेच अन्नदाता बळीराजा राहात असलेल्या ग्रामिण भागातील जनतेला शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठीकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेमधुन जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करुन पूर्ण करण्यास आम्ही आग्रही आहोत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमद केले आहे.

Adv