शहराचे नियोजन करण्यासाठी पालिकेचे नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे पालिकेत येणार का असा प्रश्न आता पालिकेला पडलेला आहे
कोरोनामुळे बरेच पदाधिकारी नगरसेवक मिस्टर इंडिया च्या भूमिकेत गेले ,सातारा शहराचे नियोजन करण्यासाठीची जबाबदारी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करंजे येथील नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे यांच्यावर सोपवली होती मात्र नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे हे जवळपास आता पालिकेत फिरकतच नाहीत त्यामुळे शहराचे नियोजन करणार कोण हा खरा प्रश्न आता पडलेला आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे यांना सभापतीपदाची मुदतवाढ दिली या संधीचे सोने करण्याची फार मोठी संधी यांच्याकडे होती मात्र ही संधी फरांदे यांनी गमावली असल्याचे दिसून येते शहराचे नियोजन तर सोडा निदान पालिकेत तरी येऊ द्या अशी अपेक्षा आता सातारकर जनता करू लागले आहे
एक वर्षावर आता सातारा पालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे सभापती नगरसेवक जर असे वागायला लागले तर कोणत्या तोंडाने लोक मते देतील तुम्ही निवडून येऊन सुद्धा जर लोकांची कामे व शहराची कामे नीट करत नसाल तर सत्तेचा उपयोग तरी काय याचा बोध संबंधित आघाडीच्या पक्षप्रतोद यांनी घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे