कांगा कॉलनी येथील निकृष्ट होत असलेल्या रस्त्याच्या संदर्भात छावा क्षात्रवीर सेनाने सातारा नामाच्या वृत्ताची दखल घेत संबंधित ठेकेदाराने काम उत्कृष्ट केले नाही तर नगरपालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
दलित योजनेअंतर्गत सुमारे 75 लक्ष रुपये खर्च करून हा रस्ता होत आहे पालिकेचे इंजिनियर डोळे मिटून हे सर्व बघत आहेत दुर्दैव म्हणजे बांधकाम सभापती मिलिंद काकडे यावर कोणतीच ॲक्शन घेताना दिसत नसल्याने पालिकेत या रस्त्याच्या संदर्भात लक्ष्मी दर्शन याची चर्चा भरपूर होत आहे बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या रस्त्याच्या संदर्भात आंदोलन केले मग का गुंडाळेल हे कळण्याइतपत सातारकर नागरिक दूध खुळे नाहीत सातारानामा ने हा प्रश्न लावून धरला असून याची दखल छावा क्षात्रवीर सेनेने घेतली आहे नगराध्यक्षांच्या केबिनच्या बाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अरबाज शेख दिला आहे
मोठ्या हुशारीने पालिकेतील विवेकी बुद्धीने सात लाखांचा धनादेश ठेकेदारास दिल्या गेल्याने त्याच्यामागे नक्कीच काळेबेरे असल्याचे दिसून येते नक्की कुणी लक्ष्मी दर्शन घेतले याची प्रचिती पूर्ण सातारा नगरपालिकेला आलीच आहे म्हणूनच सर्वजण गप्प असल्याचे दिसून येते यासंदर्भात संबंधित प्रभागाच्या नगरसेविका स्नेहा नलवडे येत्या दोन दिवसात संबंधित रस्त्याच्या बाबतीत पत्र देणार असल्याची माहिती त्यांनी सातारा नामाशी फोनवरून बोलताना दिली