सातारा नामाच्या वृत्ताने गाजली पालिकेची स्थायी समिती ची मीटिंग

49
Adv

सातारानामाने कांगा कॉलनी येथील निकृष्ट रस्ता व आरोग्य विभागाने घेतलेल्या घंटागाड्या त्याची झालेली अवस्था याचे वृत्त प्रसारित केले होते याची गंभीर दखल आज झालेल्या स्थायी समितीमध्ये माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक दत्तात्रय बनकर यांनी घेतली असल्याची माहिती काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सातारानामाकडे खाजगीत सांगितली

स्थायी समितीची मीटिंग आज पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली यामध्ये पालिकेचे अभ्यासू नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांनी आरोग्य निरीक्षक अधिकारी राजेंद्र कायगुडे यांना संबंधित घंट्या गाड्यांच्या अवस्थेबद्दल विचारणा केली की नक्की काय झाले सदरच्या आलेल्या बातम्या यावरूनच विचारणा झाली असून बांधकाम विभागाचे इंजिनीयर साबळे साहेब यांनाही कांगा कॉलनीतील रस्त्याच्या संदर्भात विचारणा झाली असल्याची माहिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी खाजगीत सातारा नामाशी बोलताना सांगितली

Adv