सातारा नगरपालिकेने 212 कोटी 19 लाख 72 हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर आज पालिकेत एकमताने मंजूर केले. यावेळी केवळ मालमत्ता करावर विसंबून न राहता राज्याच्या तिजोरीतून शहरातील महत्त्वकांक्षी योजनांसाठी निधी कास आणता येईल, यावर भर देण्यात आला. बजेटमध्ये कोणत्याही स्वरुपाची कर वाढ करण्यात आलेली नाही.
सातारा नगरपालिकेचे अर्थसंकल्पीय सभा आज नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी नगरपालिकेच्या प्रगती पथावर असणार्या कास धरणाची उंची वाढवणे, भुयारी गटार य ोजना, घनकचरा व्यवस्थापन, अमृत योजन, पाणी पुरवठा योजना यासाठी नगरपालिकेला भराव्या लागणार्या हिश्श्याची तरतूद केल्याचे त्यांनी नमूद केले. नाट्यगृह सुधारणा, उद्याने विकसीत करणे, रस्ते बांधणी, गटारे, सार्वजनिक शौचालये, मुतार्या, विद्युत दिवे, पोल बसवणे, प्रशासकीय इमारत बांधणे, अजिक्यतारा स्मृती उद्यान विकसीत करणे, हॉकर्स झोन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे यासह मूलभूत सुविधा, गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार, दिव्यांग निधी, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, महिला व बालकल्याण, शहरात सीसीटीव्ही बसवणे, अशा अनेक कामांसाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे यावर्षीच्या अंदाजपत्रकात सर्व सदस्यांसाठी वॉर्ड फंडसाठी तरतूद केली आहे. तिन्ही आघाड्यांच्या अजेंड्यावरील विशेष कामांसाठी विशेष तरतूद केली आहे. मिळणार्या व शहराच्या विकासासाठी होणारा खर्च याचा ताळमेळ घालत किशोर शिंदे यांनी अंदाजपत्रक सादर केले.
सातारा पालिकेला मालमत्ता कर 13 कोटी 75 हजार तर पाणीपट्टी 5 कोटी 50 लाख अपेक्षित धरली आहे. तसेच इमारती व जागा भाडे 2 कोटी, विशेष शिक्षण कर 2 कोटी, विकास कर 1 कोटी 50 लाख, वृक्ष कर 45 लाख, बांधकाम प्रिमियम 2 कोटी, मंडई फी 8 लाख 50 हजार, हातगाडा परवाना 25 लाख, नक्कल फी 15 लाख, मुद्रांक शुल्क अनुदान 1 कोटी, रस्ते अनुदान 2 कोटी 65 लाख, 15 व्या वित्त आयोगातून 5 कोटी, कास धरण उंची वाढवण्यासाठीचे अनुदान 12 कोटी 78 लाख, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान 1 कोटी, गुंतवणुकीवरील व्याज 1 कोटी 75 लाख, थकीत घरपट्टीवरील विलंब आकार 4 कोटी 50 लाख, छ. शाहुकला मंदिर भाडे 12 लाख, सहाय्यक अनुदान 29 कोटी 50 लाख, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 5 कोटी, फिश मार्केट अनुदान 10 लाख, अमृत योजना 15 कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 1 कोटी 53 लाख, श्रमसाफल्य योजना 2 कोटी, नगरोत्थान अनुदान (जिल्हा स्तर) 2 कोटी 25 लाख, दलितेतर योजना 1 कोटी, नगरोत्थान (राज्य स्तर) 1 कोटी, एन. यु. एल. एम. 75 लाख, प्रधानमंत्री आवास योजना 19 कोटी असे उत्पन्न गृहीत धरले आहे.
तसेच पालिकेचा वर्षभरातील खर्चामधील 19 कोटी 51 लाख 85 हजार कर्मचार्यांच्या वेतनावर तर निवृत्ती वेतनावर 15 कोटी 10 लाख होणार आहे. शिक्षण मंडळाचे अंशदान 2 कोटी 98 हजार, कर्ज परतफेड 45 लाख, दिव्यांग कल्याणकारी योजना 35 लाख, क्रीडाविषयक बाबी 30 लाख, वृक्षारोपण 20 लाख, उद्याने देखभाल 2 कोटी 24 लाख, कर्मचारी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती 30 लाख, रस्ते, नाले गटारे सफाई 1 कोटी 40 लाख, पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती 1 कोटी 55 लाख, पाणी बिले 1 कोटी 50 लाख, इमारतींची देखभाल दुरुस्ती (पॅचिंग) 1 कोटी, घसारा निधी 5 लाख, वेतन राखीव निधी 20 लाख, मागासवर्गीय दुर्बल घटक योजना 35 लाख, महिला व बालकल्याण 35 लाख, मटण मार्केट विकसीत करणे / फीश मार्केट 10 लाख, झोपडपट्टी सुधारणा (आयएचएसडीपी) 1 कोटी, नवीन रस्ते (जनरल निधी) 7 कोटी 75 लाख, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 10 कोटी, कास धरण उंची योजना 12 कोटी 78 लाख, एलईडी दिवे बसवणे 1 कोटी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे 5 लाख, अमृत योजना 12 कोटी 25 लाख, नगरोत्थान (जिल्हास्तर) 2 कोटी 75 लाख, प्रधान मंत्री आवास योजना 19 कोटी 15 लाख, प्रशासकीय इमारत 1 कोटी, शाहुकला मंदिर सुधारणा 50 लाख असा खर्च अपेक्षित आहे.