लाचखोरी नंतर सातारा पालिकेच्या अतिरिक्त आरोग्य विभागाचा पदभार सतीश साखरे शैलेश अष्टेकर व दिसले यांच्याकडे आज सोपवण्यात आला माजी आरोग्य अधिकारी साखरे व रणदिवे यांची पालिकेत घरवापसी होणार असल्याची चर्चा करण्यात आली असल्याचे समजते
नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आरोग्य सभापती अनिता घोरपडे नगरसेवक दत्तात्रय बनकर मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यामध्ये आज सकाळी बैठक संपन्न झाली यावेळी असा निर्णय घेण्यात आला की करोनासारखी महामारी तसेच शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही महत्त्वाची असल्याने सतीश साखरे शैलेश अष्टेकर व दिसले यांच्याकडे या आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार आज देण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली
लाचखोरी प्रकरणी प्रवीण यादव व गणेश टोपे हे आरोग्य निरीक्षक अटकेत असून निरीक्षक हे पद रिकामे होते आरोग्य विभागाची जबाबदारी ही महत्त्वपूर्ण असते त्यामुळे या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे