आरोग्य निरीक्षकांच्या वरदहस्ताने चालू आहे हॉटेल व चायनीजची दुर्गंधी?

54
Adv

मोती तळ्या शेजारीली पालिकेच्या सिस नंबर २७१ इमारतीमधील अजिंक्य चायनीज व इतर हॉटेल च्या दुर्गंधी ने पाणीपुरवठा चे कर्मचारी वैतागले असून संबंधित आरोग्य निरीक्षक यादव यांना सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्याच वरदहस्ताने हे सर्व चालू आहे की काय असा प्रश्न पाणीपुरवठा च्या कर्मचाऱ्यांना पडला आहे

सिस नंबर 271 ही इमारत पालिकेच्या मालकीची असून सातारानामाने काही दिवसापूर्वी या जागेतील चायनीज व हॉटेल व्यवसायिक दुर्गंधी करत असल्याचे वृत्त प्रसारित केले होते त्यावर सभापती अनिता घोरपडे यांनी संबंधित आरोग्य निरीक्षक यादव साहेब यांना बोलावून संबंधित गाळेधारक व हॉटेल्स चायनीज व जो कोणी दुर्गंधी पसरवत आहेत त्यांना नोटीस द्या असा आदेशही दिला होता गेल्या आठ दिवसापूर्वी हा आदेश दिला गेला असून त्यालाही आरोग्य निरीक्षकांनी गोल केला असल्याचे दिसून येते

लक्ष्मी दर्शनाने एक तर आरोग्याचे तीन तेरा वाजले असून आरोग्य निरीक्षक शहराचे मालक झाले असल्यागत वागत आहेत पाणीपुरवठा च्या कर्मचाऱ्यांवर रोगराई पसरली तर याला आरोग्य निरीक्षक यादव हेच जबाबदार असतील असे काही कर्मचाऱ्यांनी सातारा नामाशी बोलताना सांगितले संबंधित हॉटेल व चायनीज वर निरीक्षकांच्या दर्शन लक्ष्मीचे झाले की काय अशीही कुजबुज या गळ्यातील काही गाळेधारकांनी बोलून दाखवली

आरोग्यात लक्ष्मी चे दर्शन झाल्याशिवाय काही होत नाही हे खरे त्यातलाच हा प्रकार असू शकतो असे येथील गाळेधारक खासगी मध्ये चर्चा करताना आढळून आले आता तरी यादव साहेब जागे होणार का, का पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या आरोग्याशी खेळणार हे बघणे आता उत्सुकतेचे असेल

Adv