Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District निवास थोरातांचा उमेदवारी अर्ज अवैध

निवास थोरातांचा उमेदवारी अर्ज अवैध

598
Adv

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या निवास थोरात यांचा अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी अवैध ठरवला होता.

त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्याकडे अपिल दाखल केले होते. त्यांनी थोरात यांचा अर्ज वैध ठरवला. त्यावर हरकत घेवुन थोरात यांच्या निकालाला आव्हाण देणारी याची उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता त्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे. उच्च न्यायालयाने निवडणुक निर्णय़ अधिकारी यांचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे थोरात यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.

छाननीत २३४ उमेदवारांच्या दाखल २५१ उमेदवारी अर्जापैकी २०५ उमेदवारांचे २१८ अर्ज वैध ठरले तर २९ उमेदवारांचे ३३ अर्ज अवैध ठरले. अवैध ठरलेल्या २९ पैकी २६ उमेदवारांचे अर्ज त्यांनी मागील पाच ऊस गळीत हंगामापैकी किमान तीन हंगामात कारखान्याला ऊस घातला नसल्याने अवैध ठरले. एक अर्ज उमेदवाराकडे सहकारी बँकेची थकबाकी असल्याने एक अर्ज कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित झालेने व एका उमेदवाराच्या अर्जावर सूचकाचा तपशील नसल्याने व अनुमोदक नसल्याने सदर अर्ज अवैध ठरले आहेत.

श्री. थोरात यांच्या निकालाला आव्हाण देणारी याचीका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला असुन निवडणुक निर्णय अधिकारी श्री. सुद्रीक यांनी दिलेला निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे निवास थोरात याच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.

Adv